आयरा खान व नुपूर शिखरे यांचा रिसेप्शन सोहळा शनिवारी (१३ जानेवारी रोजी) मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सिनेजगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. इतकंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्याला हजर राहिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शन पार्टीला हजर राहून दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आमिर खानने मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं होतं, त्या निमंत्रणाचा मान ठेवत एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यांचा कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आला आहे.

Video: आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शनला पत्नीसह पोहोचले राज ठाकरे, तर आदित्य ठाकरेंची आई व भावासह हजेरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय मिसेस उपमुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीसदेखील या रिसेप्शन पार्टीत उपस्थित राहिल्या. त्यांनी पिवळ्या रंगाचा सुंदरचा ड्रेस परिधान केला होता. त्यांच्या एकूणच स्टायलिश लूकने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.

आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाचे मुंबईत रिसेप्शन; शाही सोहळ्यातील फोटो पाहिलेत का?

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर व रीना दत्ता यांची मुलगी आयरा खानचं नुपूर शिखरेशी ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न झालं. त्यानंतर उदयपूरमध्ये दोघांनी मित्र-मैत्रिणी व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. आज मुंबईत सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींसाठी खास रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता.