बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान व भारतीय क्रिकेटर शुबमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. शुबमन व साराला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटदेखील करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच सारा व शुबमनचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. डेटिंगच्या चर्चांना उधाण आल्यानंतर आता अखेर शुबमननेच याबद्दल मौन सोडत भाष्य केलं आहे.

शुबमन गिलने नुकतीच ‘दिल दिया गल्ला’ या पंजाबी शोमध्ये हजेरी लावली. सोनम बजेवा होस्ट करत असलेल्या या शोमध्ये शुबमनला “बॉलिवूडमधील सगळ्यात तंदुरुस्त अभिनेत्री कोण?” असा प्रश्न विचारण्यात आला. क्षणाचाही विलंब न करता शुबमनने सारा अली खानचं नाव घेतलं. त्यानंतर “सारा अली खानला तू डेट करत आहेस का?”, असा प्रश्न शुबमनला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शुबमनने पहिल्यांदाच सारा अली खानला डेट करत असल्याच्या चर्चांवर मौन सोडलं.

हेही वाचा >> Shraddha Murder Case: ‘डेक्सटर’ वेब सीरिज पाहून केले प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे; पण या ‘Dexter’ ची कथा आहे तरी काय?

शुबमन यावर उत्तर देत “कदाचित” असं म्हणाला. त्यानंतर होस्टने “सारा का सारा सच बोलो”, असं म्हटल्यावरही शुबमन थोडं कोड्यातच उत्तर दिलं. तो म्हणाला, “सारा दा सारा सच बोल दिया. कदाचित हा, कदाचित नाही”. शुबमनने खुलेपणाने डेटिंगच्या चर्चांवर नेमकं उत्तर दिलं नसलं तरीही त्याने साराला डेट करत असल्याच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचंदेखील म्हटलेलं नाही. त्यामुळे शुबमनने आणि  सारा खान डेट करत आहे की नाही, याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे.

हेही पाहा >> Photos: नऊवारी साडीतील मराठमोळा लूक ते गॉगलची फॅशन, प्राजक्ता माळीचे बालपणीचे फोटो पाहिलेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सारा अली खानने शुबमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चांवर अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी शुबमनचं नाव सारा तेंडूलकरसह जोडलं गेलं होतं. तर सारा अली खान व अभिनेता कार्तिक आर्यनच्या अफेरच्या चर्चाही रंगल्या होत्या.