बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या आगामी ‘वॉल्टेयर वीरैया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात उर्वशी दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवींसह आयटम सॉंग करताना दिसणार आहे. उर्वशी सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘वॉल्टेयर वीरैया’ चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्टेजवर बोलत असतानाच प्रेक्षकांमधून रिषभ पंतचं नाव घेऊन तिला चिडवलं जात असल्याचं दिसत आहे. रिषभ पंतचं नाव घेतल्यानंतर उर्वशीने लगेचच बोलणं थांबवल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

हेही वाचा>> Video: ‘Just Married’, लग्नानंतर राखी सावंतच्या रिसेप्शनचा व्हिडीओ समोर

हेही वाचा>> ‘RRR’ला पुरस्कार मिळाल्यानंतर ‘तेलुगू ध्वज’चा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचं ट्वीट; अदनान सामी म्हणाला…

उर्वशीने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. “प्रेक्षक रिषभ पंत असं म्हणत आहेत”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “मलाही रिषभ पंत असं ऐकू येत आहे”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा>> Video: राखी सावंतच्या लग्नाचा व्हिडीओ समोर, बॉयफ्रेंड आदिलला वरमाला घातली अन्…

उर्वशी रौतेलाचा ‘वॉल्टेयर वीरैया’ हा चित्रपट येत्या १३ जानेवारीला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चिरंजीवी, रवी तेजा व श्रुती हसन या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowd shouted rishabh pant at waltair veerayya promotional event while urvashi rautela speech video kak
First published on: 12-01-2023 at 13:09 IST