शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या जवानने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटात आसामचा प्रसिद्ध दिग्दर्शक केनी बसुमतारीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अलीकडेच पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने चित्रपटसृष्टीबद्दल आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा : ‘नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचं शीर्षक चोरल्याच्या आरोपावर शरद पोंक्षे म्हणाले, “सेन्सॉरच्या पत्राचा पुरावा…

“‘जवान’ चित्रपटातील एका जेलच्या सेटसाठी जवळपास ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मी एवढ्या पैशांमध्ये संपूर्ण चित्रपट बनवू शकतो.” असं केनीने हिमालयीन फेस्टिव्हलमध्ये पीटीआयशी संवाद साधताना सांगितलं. अभिनेत्याला सुरुवातीपासून बॉलीवूडबद्दल प्रचंड आकर्षण होतं. शाहरुख खान आणि जुही चावला यांच्यावर चित्रित झालेलं “तू है मेरी किरण” हे गाणं त्याला खूप लहानपणी खूप आवडायचं.

हेही वाचा : “तुझा सर्वात आवडता विनोदी चित्रपट कोणता?” प्राजक्ता माळी म्हणाली “माझ्या…”

‘डर’ चित्रपटातील गाण्याविषयी अभिनेता म्हणाला, “तू है मेरी किरण” ऐकण्यासाठी मी खास कॅसेट विकत घेतली होती. त्यानंतर जेव्हा गोष्टी कळू लागल्या तेव्हा जाणवलं त्या गाण्याचा अर्थ फारच चुकीचा होता. “तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण” या एका ओळीचा शब्दश: अर्थ पाहिला तरी तो अतिशय चुकीचा आहे.”

“मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या या चित्रपटांचं अनुकरण करत मुलं मोठी होत असतात. ‘डर’ चित्रपटात अभिनेता मुलीला भर रस्त्यात जबरदस्ती किस करतो या गोष्टीचं आज समाजाच्या दृष्टीकोनातून समर्थन करता येणार नाही. अलीकडची पिढी तेच पाहून मोठी होत आहे. त्यामुळे तो सीन मला वैयक्तिकदृष्ट्या पटलेला नाही.” असं केनी बसुमतारीने सांगितलं.

हेही वाचा : “कोणाबरोबरही झोपायला जबरदस्ती…”, नीना गुप्ता यांनी कास्टिंग काउचबद्दल केलेले विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुख खान, जुही चावला आणि सनी देओल यांच्या मुख्य भूमिका असलेला डर चित्रपट १९९३ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये किंग खानने खलनायकाची भूमिका साकारली होती. तसेच केनी बसुमतारीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ‘जवान’ चित्रपटात भारतीय कमांडोची भूमिका केली आहे. त्याने साकारलेल्या पात्राचं नाव ‘नाझिर अहमद’ असं आहे.