हॉलिवूड अभिनेता रायन रेनॉल्ड्सची चित्रपट मालिका ‘डेडपूल’चे भारतातही प्रचंड चाहते आहेत. ‘डेडपूल १’ आणि ‘डेडपूल २’ नंतर आता चाहते ‘डेडपूल ३’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्याचे चित्रीकरणदेखील सुरू झाले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या सेटवरील चित्रीकरणाचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, यावेळी ‘डेडपूल’बरोबरच एक्स मेन सीरीजचा ‘द वुल्व्हरिन’ फेम अभिनेता ह्यू जॅकमन देखील या चित्रपटात दिसणार आहे.

इतकंच नव्हे तर या तिसऱ्या भागात बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचीसुद्धा एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये ‘डेडपूल ३’च्या सेटवर रायन रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमनसह बॉलिवूडचा डिस्को डान्सर अर्थात मिथुन चक्रवर्तीसुद्धा दिसत आहेत. नेमकं हे प्रकरण काय? मिथुनदा खरंच ‘डेडपूल ३’मध्ये झळकणार आहेत का? या फोटोमागे नेमकं सत्य काय? हेच आपण जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार नाही ‘अ‍ॅनिमल’चा एक्स्टेंडेड कट; नेमकं कारण जाणून घ्या

तुम्हाला वाटत असेल की ‘डेडपूल ३’मध्ये मिथुन चक्रवर्ती दिसणार तर तसं नाहीये. सोशल मीडियावर व्हायरल होणारा तो फोटो चित्रपटाच्या सेटवरीलच आहे, पण त्यात दिसणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांचा फोटो मात्र दुसऱ्या एका चित्रपटाच्या फोटोमधून वापरण्यात आला आहे. मूळ फोटोमध्ये सेटवर फक्त रायन रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमन हे दोघे कलाकारच पाहायला मिळत आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा हा फोटो कुणीतरी एडिट करून व्हायरल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
mithun-deadpool
फोटो : सोशल मीडिया

खरंतर या फोटोमध्ये मिथुन चांगलेच तरुण दिसत असल्याने बऱ्याच लोकांना हा प्रकार समजायला जरा वेळ लागला. परंतु आता या फोटोमागील नेमकं सत्य समोर आलं आहे. ‘डेडपूल ३’ बद्दल बोलायचे झाले तर असा अंदाज बांधला जात आहे की चाहत्यांना या चित्रपटात डेडपूल आणि वुल्व्हरिन यांच्यातील जबरदस्त लढत पाहायला मिळेल, पण शेवटी दोघेही एकत्र व्हिलनशी दोन हात करतानाही दिसणार आहेत. ‘डेडपूल’ 3 मध्ये वूल्व्हरिन पिवळ्या रंगाच्या नवीन पोशाखात दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट २०२४ च्या अखेरपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.