उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा नुकताच पार पडला. अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी हा सोहळा संपन्न झाला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली. सध्या त्याचे अनेक व्हिडीओ समोर येताना दिसत आहेत.

बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणून रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणला ओळखलं जातं. त्या दोघांच्या केमिस्ट्रीचे लाखो चाहते आहेत. ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. नुकतंच रणवीर-दीपिकाने अंबानींच्या धाकट्या लेकाच्या साखरपुडा सोहळ्याला हजेरी लावली. त्या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
आणखी वाचा : Anant-Radhika Engagement : अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा दणक्यात साखरपुडा, कुटुंबियांचे खास फोटो पाहिलेत का? 

या व्हिडीओत रणवीर आणि दीपिका हे अँटिलियामध्ये फोटोग्राफर्सला फोटो देण्यासाठी उभे असल्याचे पाहायला मिळतात. यावेळी दीपिकाने लाल रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती. तर रणवीरने गडद निळ्या रंगाचा कुर्ता, जॅकेट असा लूक केला होता. हे दोघेही अगदी हातात हात घालून, राजेशाही थाटात अंनत-राधिकाच्या साखरपुड्यासाठी पोहोचले.

यावेळी रणवीर हा दीपिकाच्या लूकची काळजी करताना दिसला. दीपिकाने परिधान केलेल्या साडीमुळे तिला चालताना अडचणी येत होत्या. यावेळी रणवीर तिची साडी योग्य आहे की नाही याची खात्री करुन हसत हसत फोटोसाठी पोज दिली. त्या दोघांमधील केमिस्ट्री पाहून चाहतेही भारावले.

आणखी वाचा : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा, पहिला फोटो समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रणवीर सिंह हा सर्कस या चित्रपटात झळकला होता. गेल्या २२ डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. सध्या तो करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो आलिया भट्टसोबत दिसणार आहे. तर दीपिका ही ‘पठाण’ चित्रपटात झळकणार आहे. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.