Dev Anand Marriage: बॉलीवूडला एका वेगळ्या उंचीवर नेण्यामध्ये अनेक कलाकारांनी महत्वाचे योगदान दिले आहे. यामध्ये देव आनंद यांचेदेखील प्रामुख्याने घेतले जाते. अनेक सुपरहीट चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

‘जॉनी मेरा नाम’ ते ‘सीआयडी’ पर्यंत अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. व्यावसायिक आयुष्यामुळे देव आनंद जितके चर्चेत राहिले, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुलेदेखील चर्चेत होते. त्यांच्या व सुरैय्या यांच्या प्रेमकहानीची मोठी चर्चा झाली.

मात्र, देव आनंद यांच्या लग्नाचीदेखील मोठी चर्चा झाली. त्यांना अशा अभिनेत्रीवर झाले, जी फ्लॉफ अभिनेत्री मानली जायची. त्यांनी इतक्या गुप्त पद्धतीने लग्न केले, की जेव्हा त्यांच्या लग्नाची बातमी सर्वांना माहित झाली, तेव्हा इंडस्ट्रीमधील लोकांनासुद्धा धक्का बसला होता.

देव आनंद त्यांच्या लग्नाबाबत काय म्हणालेले?

देव आनंद यांनी अभिनेत्री कल्पना कार्तिक यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. टॅक्सी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या शूटिंगदरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. भेटत राहिले. त्यामुळे त्यांचे नाते मजबूत झाले.

एक दिवशी ब्रेकदरम्यान देव आनंद व कल्पना कोणालाही न सांगता बाहेर गेले. त्यामुळे सगळ्यांना त्यांची काळजी वाटू लागली. ते कुठे गेले, हे कोणालाच माहित नव्हते. जेव्हा ते परत आले, तेव्हा सेटवरील लोकांनी त्यांना विचारले की ते कुठे गेले होते, त्यावर दोघांनीही काहीच उत्तर दिले नाही. मात्र, एका कॅमेरामनने देव आनंद यांच्या बोटातील अंगठीचे फोटो काढले होते. त्यामुळे त्यांनी लग्न केले आहे, हे सर्वांना माहित झाले. त्यानंतर काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला होता की या जोडप्याने लग्न केले आहे.

देव आनंद यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सर्वांना का सांगितले नाही? यावर ते म्हणालेले, “मला माझ्या लग्नामुळे कोणताही गोंधळ निर्माण करायचा नव्हता.” कल्पना ईसाई-पंजाबी कुटुंबातील होत्या. जेव्हा देव आनंद यांचे भाऊ चेतन आनंद यांनी त्यांना बाजी चित्रपटात भूमिका दिली होती. त्यावेळी त्यांनी त्यांचे मोना ,सिंह हे नाव बदलून कल्पना कार्तिक हे नाव स्वत:साठी वापरले होते.

देव आनंद व कल्पना कार्तिक यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर कल्पना यांनी चित्रपटात काम करणे बंद केले होते. पण, देव आनंद चित्रपटात काम करत राहिले. २०११ ला देव आनंद यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.