‘व्हाय दिस कोलावरी’ या गाण्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा धनुष तमिळ सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. धनुषने दाक्षिणात्य व हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘रांझणा’ हा त्याचा गाजलेला बॉलीवूड चित्रपट. धनुष सध्या त्याचा आगामी चित्रपट डी ५१ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तो तिरुपतीमध्ये शूटिंग करत आहे. परंतु, शूटिंगमुळे तिरुपतीजवळ ट्रॅफिक समस्या निर्माण झाली आणि याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

धनुषच्या चित्रपटाच्या शूटिंग शेड्यूलमुळे तिरुपतीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या निर्माण झाली आणि त्यामुळे तो अडचणीत आला आहे. धनुष सध्या तिरुपतीमध्ये त्याच्या आगामी चित्रपटासाठी चित्रीकरण करत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धनुष गोंधळलेला दिसत आहे. केस व दाढी वाढलेली, ढगळा शर्ट आणि पँट अशा लूकमध्ये धनुष दिसतोय. बाजारात सीनचे शूटिंग सुरू होते, हा सेट रस्त्याच्या मध्यभागी असल्याने ट्रॅफिक समस्या निर्माण झाली.

हेही वाचा… “विजू आणि मी एकत्र…”, रश्मिका मंदानाचं विजय देवरकोंडाबद्दल विधान; म्हणाली, “प्रत्येक गोष्टीत…”

या चित्रपटाची शूटिंग सुरू असताना धनुषची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. यामुळे तिरुपती मंदिरात जाणऱ्या भक्तांची आणि स्थानिकांची गैरसोय झाली आणि लोक संतापले. ‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी काही भक्तांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी शूटिंग थांबवत प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नंतर लक्षात आलं की चित्रपटाच्या निर्मात्यांनी शूटिंगसाठी परवानगी घेतली होती.

हेही वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चित्रपटात धनुषची मुख्य भूमिका आहे, तर रश्मिका मंदाना नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांचीही यात खास भूमिका असणार आहे.