scorecardresearch

Premium

Video: धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली? अमेरिकेत उपचार सुरु? त्यांनीच केला खुलासा, व्हिडीओ व्हायरल

सनी देओल धर्मेंद्र यांना उपचारासाठी अमेरिकेला घेऊन गेला असल्याची चर्चा

dharmendra
धर्मेंद्र

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र नेहमी चर्चेत असतात. नुकतीच त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली होती. धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली असून उपचारासाठी ते मुलगा सनी आणि पत्नी प्रकाश कौरबरोबर अमेरिकेला गेले असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, धर्मेंद्र यांनी या चर्चांवर मौन सोडलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अमेरिकेला जाण्यामागच कारण सांगितलं आहे.

हेही वाचा- “त्यांचं दहशतवाद्यांवर प्रेम…” नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ टीकेनंतर विवेक अग्निहोत्रींचं प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्या धर्मामुळे…”

PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”
UK Vs UK Tea Controversy
चहामध्ये मीठ? चहाच्या रेसिपीवरून अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पेटला वाद; वाचा, नेमके प्रकरण काय?
Emmanuel Macron
“२०३० पर्यंत फ्रान्सच्या विद्यापीठांत ३० हजार भारतीय विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट”, प्रजासत्ताक दिनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितली योजना
american presidential elections marathi news, set back for nikki haley marathi news
विश्लेषण : निकी हॅले यांच्यासाठी ‘होमपिच’वरील लढत अखेरची? प्रायमरीजच्या किचकट प्रक्रियेत ट्रम्प यांना कसे पराभूत करणार?

धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते घरातल्या श्वानाबरोबर खेळताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना धर्मेंद्र यांनी लिहिले- मित्रांनो, खूप दिवसांनी मी यूएसएमध्ये माझ्या सुट्टीचा आनंद घेत आहे. माझ्या नवीन चित्रपटासाठी लवकरच परतेन. हा प्रेमळ पाळीव प्राणी माझ्या प्रेमात पडला आहे. धर्मेद्र यांच्या या पोस्टनंतर ते उपचारासाठी नव्हे तर सुट्टीसाठी अमेरिकेला गेले असल्याचे समोर आलं आहे.

धर्मेंद्रच्या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले- “नमस्कार सर, कृपया निरोगी परत या. तुमच्या आरोग्याबाबत रोज माहिती देत राहा.” आणखी एका चाहत्याने लिहिले “प्रत्येकजण तुमच्यावर प्रेम करतो सर, तुम्ही एक रत्न आहात.”

हेही वाचा- “मैं तुम्हारा बाप…” ‘जवान’चा नवा कोरा डायलॉग चर्चेत; शाहरुख खानने शेअर केला खास प्रोमो

मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र २० दिवस अमेरिकेत राहणार आहेत. तिथे ते आपल्या कुटुंबाबरोबर सुट्टी एन्जॉय करणार आहे. सनी देओलची बहीण देखील यूएसमध्ये राहते. सध्या देओल कुटुंब युएसएमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

हेही वाचा-“माझ्या प्रिय बाळाच्या बाळाला…”, नातवासाठी आजी रवीना टंडनची खास पोस्ट; गोंडस फोटो केले शेअर

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, धर्मेंद्र शेवटचे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्याबरोबर आलिया भट्ट, रणवीर सिंग, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा एक किसिंग सीन होता. चित्रपटाबरोबर या सीनचीही जोरदार चर्चा झाली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dharmendra shares video of enjoying holiday in us amid health treatment dpj

First published on: 13-09-2023 at 15:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×