Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding: बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लग्नबंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपासून रकुल व जॅकीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आज, २१ फेब्रुवारीला दोघांचा गोव्यात मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. सोशल मीडियावर दोघांनी लग्नातील काही खास क्षणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी यांचं दोन पद्धतीत लग्न झालं. सकाळी शीख धर्माच्या आनंद कारज रितीरिवाजानुसार दोघं लग्नबंधनात अडकले. त्यानंतर सिंधी रितीरिवाजानुसार रकुल व जॅकीने सात फेरे घेऊन आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Video: रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानीच्या संगीत सोहळ्यात शिल्पा शेट्टीचा पत्नीसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

जॅकी हा लातुर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांचा मेहुणा आहे. धिरज यांची पत्नी दिपशिखा देशमुख या जॅकीच्या सख्ख्या मोठ्या बहीण आहेत. त्यामुळेच रकुल व जॅकीचं लग्न होताचा धिरज देशमुख पत्नी दिपशिखा व लेकीसह पापाराझींना मिठाई वाटताना दिसले. तसेच त्यांनी पापाराझींने आभारही मानले. यासंबंधित व्हिडीओ ‘वरिंदर चावला’ (Varinder Chawla), Voompla या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

हेही वाचा – “झोका तुटेल…”, नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर भडकली मेघा धाडे, म्हणाली, “समोर आलास तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रकुल व जॅकीच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते आणि दोघं एकमेकांचे शेजारी होते. पण तरीही दोघांमध्ये कधीच जास्त बोलणं होतं नव्हतं. दोघांची पहिली भेट लॉकडाऊनच्या वेळी झाली होती. ३ ते ४ महिने दोघांची चांगली मैत्री होती. त्यानंतर दोघं रिलेशनशिपमध्ये आले. आता ४ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकत आहेत.