दिलजीत दोसांझच्या दिल-ल्यूमिनाटी टूर अंतर्गत एक कॉन्सर्ट नुकताच चंदीगडमध्ये पार पडला. या इव्हेंटमधील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिलजीतच्या ‘चमकिला’ या चित्रपटाचा दिग्दर्शक इम्तियाज अलीने देखील काही क्लिप्स त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केल्या. इम्तियाजने हे व्हिडीओ शेअर करत दिलजीतने ‘चमकिला’ सिनेमाचा एक सीन पुन्हा खऱ्या आयुष्यात कसा रिक्रिएट केला हे दाखवले.

इम्तियाजने एक व्हिडीओ आपल्या स्टोरीमध्ये रिशेअर केला ज्यामध्ये स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर जमलेली गर्दी दिलजीतच्या कॉन्सर्टचा आनंद घेताना दिसतेय. काही लोक दिलजीतला लाईव्ह पाहण्यासाठी झाडांवर चढलेलेही दिसत होते.

हेही वाचा…“…म्हणून मला बॉलीवूड पार्ट्यांमध्ये बोलवत नाहीत”, अभिनेते मनोज बाजपेयींचा खुलासा; म्हणाले, “त्यांना वाटतं…”

फॅन्सच्या उत्साहाचे हे क्लिप शेअर करत इम्तियाज अलीने लिहिले, ‘दिलजीत इफेक्ट’,” त्याच कॅप्शनमध्ये इम्तियाजने “चमकिला पुन्हा साकारत आहे” असे नमूद केले. त्याच्या पुढील स्टोरीमध्ये दिलजीतच्या परफॉर्मन्सच्या ठिकाणी लोक नृत्य करताना दिसत आहेत. तर इम्तियाजच्या तिसऱ्या स्टोरीत दिलजीतने ‘चमकिला’ चित्रपटातील गाणे सादर केल्याचा क्षण दाखवला, ज्यावर ‘चंदीगडमध्ये चमकिला’ असे लिहिले होते.

कॉन्सर्ट दरम्यान, दिलजीतने भारतातील कॉन्सर्टसाठी असणाऱ्या अपुऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधांवर) भाष्य केले. तो म्हणाला की, “मी परफॉर्म करताना मला प्रेक्षक माझ्या भोवती हवे असतात. भारतातल्या कॉन्सर्टसाठी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण होत नाही तोपर्यंत मी भारतात परफॉर्म करणार नाही.”

हेही वाचा…नेटफ्लिक्सवरील ‘हे’ सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमे पाहिलेत का? गूढ कथा आणि रंजक वळणांसह आहेत भरपूर ट्विस्ट

दिलजीतने देखील आपल्या चंदीगडमधील कॉन्सर्टचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहिले, ” तुम्ही मला कितीही रोखण्याचे प्रयत्न केले तरीसुद्धा मी पंजाबमध्ये आलोच ओए, चंदीगड मॅजिक होतं दिल-ल्यूमिनाटी टूर, वर्ष २४ .”

एका पोस्टमध्ये दिलजीतने लिहिले, “चंदीगड खूप खूप धन्यवाद साऱ्यांनी खूप सपोर्ट केला.. दोसांझवाला तुम्हा लोकांवर खूप प्रेम करतो .” त्याच्या या पोस्टवर एका चाहत्याने लिहिले, “तुझ्या गाण्याने तू माझं मन जिंकलं आहेस, “तर दुसऱ्याने त्याला G.O.A.T” असे संबोधले.

हेही वाचा…झाकीर हुसैन यांची ‘ती’ शेवटची पोस्ट चर्चेत, शेअर केला होता ‘हा’ खास क्षण; चाहते कमेंट करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलजीतच्या कॉन्सर्टच्या आधी, ‘चंदीगड कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स’ (CCPCR) ने दिलजीतला सल्ला देत दारूशी संबंधित गाणी जसे की ‘पाटियाला पेग’, ‘५ तारा’, आणि ‘केस’ हे गाणी परफॉर्म न करण्याचे आवाहन केले होते.