बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने आपल्या फिल्मी करिअरमध्ये ‘कहो ना प्यार है’ ते ‘अग्निपथ’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या याच सुपरहिट चित्रपटांच्या यादीत ‘क्रिश’चाही समावेश आहे. या फ्रँचायझीचे आतापर्यंत प्रदर्शित झालेले चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. हृतिकचे चाहते त्याच्या या ‘क्रिश’ फ्रँचायझीच्या पुढच्या भागाचे आतुरतेने वाट बघत आहेत.

‘क्रिश ३’ २०१३ साली प्रदर्शित झाला होता, त्यानंतर चित्रपटाच्या चौथ्या भागाबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या. अलीकडेच चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी या चित्रपटाच्या पुढील भागाविषयी भाष्य केलं आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन म्हणाले की, “मला ‘क्रिश ४’ बनवण्यात अजिबात घाई करायची नाही. चित्रपटाचे शूटिंग २०२४ नंतर सुरू होणार आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर टीम काम करत आहे. त्यानंतर प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू करण्यात येईल.”

आणखी वाचा : सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ बॉक्स ऑफिसवर ठरू शकतो जबरदस्त हीट; ‘ही’ आहेत पाच कारणं

एकूणच चित्रपटाची कथा आणि विषय वेगळा असल्याने याच्या स्क्रिप्टसाठी वेळ लागत असल्याचं राकेश रोशन यांनी स्पष्ट केलं. ‘क्रिश ४’ हा चित्रपट करण्यात कोणतीही घाई न करता त्याला योग्य न्याय द्यायचा असल्याचं राकेश रोशन यांनी सांगितलं. राकेश रोशन यांच्या ‘क्रिश’ फ्रँचायझीला प्रेक्षकांनी आजवर उत्तम प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा : ‘स्कॅम १९९२’ वेबसीरिजमधील अभिनेत्यावर आली काम मागायची वेळ; ट्विटरवरुन केली विनंती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हृतिक रोशन नुकताच ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात झळकला. याबरोबरच हृतिक त्याच्या आगामी ‘वॉर २’ या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरू करणार आहे. याचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहे. याबरोबरच हृतिक सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात हृतिकसह दीपिका पदूकोण आणि अनिल कपूरही दिसणार आहेत. हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.