मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. देशाचे पंतप्रधानपद भूषविलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा त्यांनी केली आहे. रवी जाधव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

रवी जाधव यांच्या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रवी जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पंकज त्रिपाठीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी “मैं रहूं या ना रहूं, ये देश रहना चाहिए – अटल. सर्वोच्च नेता अटल बिहारी वाजपेयी यांची जीवनकथा पडद्यावर मांडण्याचं भाग्य मला लाभलं”, असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा >> “व्यायामामुळे नाही तर प्रोटीन पावडर…” जिममध्ये वर्कआऊट करताना मृत्यू होण्याबाबत सुनील शेट्टीचं वक्तव्य

हेही वाचा >> Video: शालिन भानोतचं शिव ठाकरेने तोंड पकडलं, जोरात ढकललं अन्….; ‘बिग बॉस’च्या घरात हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित चित्रपटाची कथा असणार आहे. या चित्रपटाचं नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. या वर्षीच्या जून महिन्यातच रवी जाधव यांनी चित्रपटाबद्दल घोषणा केली होती. त्यामुळे चित्रपटात अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत कोण असणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती.

हेही पाहा >> Drishyam 2: छोट्या अनुला ५० लाख, अजय देवगणला तब्बूपेक्षा दहापट पैसे; ‘दृश्यम २’साठी कोणी किती मानधन घेतलं पाहिलं का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकज त्रिपाठी चित्रपटातील भूमिकेबद्दल म्हणाला, “अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्याच्या भूमिका मला साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे. राजकीय नेता असण्याबरोबरच ते एक उत्तम लेखक व कवी होते. त्यामुळे त्यांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे”.