‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात कार्तिक आर्यन व कियारा अडवाणीच्या मुख्य भूमिका आहेत, तर मराठमोळ्या समीर विद्वांसने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कथा एकतर्फी असल्याचं म्हणत टीकाही झाली. त्यात कथाची (कियाराने साकारलेले पात्र) बाजू दाखवण्यात आली नाही, असं नेटकरी म्हणत होते. त्यावर समीरने प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांना पुरणपोळी नाही तर ‘हा’ पदार्थ आवडतो; खुलासा करत म्हणाले, “मी रात्री १-२ वाजता फ्रीजमधून…”

समीर म्हणाला, “होय, कथा सत्तूच्या दृष्टिकोनातून दाखविण्यात आली आहे कारण पहिल्या दृश्यापासून ही कथा त्याच्या आणि कथाबरोबर असलेल्या त्याच्या नात्याभोवती फिरते. आम्ही या विषयावर अनेक चित्रपट पाहिले आहेत परंतु आमचे लेखक करण शर्मा यांची कल्पना स्त्रीवादी पतीच्या दृष्टिकोनातून प्रेमकथा दाखवण्याची होती. त्यामुळे हा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला होता. प्रामाणिकपणे मला वाटतं की जेव्हा समाजातील पुरुष बदलतात तेव्हा स्त्रीवादाचे खरे उद्दिष्ट साध्य होते. आम्हाला अशा माणसाची कहाणी दाखवायची होती जो समाजाच्या नजरेत हरलेला आहे, ज्याला काहीच येत नाही, पण तो एक चांगला आणि आधार देणारा नवरा आहे. कदाचित हेच त्याचे ध्येय आहे. म्हणूनच सत्तू म्हणतो की तो कथाच्या स्वाभिमान मिळवण्याच्या लढ्यात नेहमी तिच्यासोबत असेल.”

अमृता फडणवीसांनी खुपणाऱ्या ‘त्या’ गोष्टी सांगताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे लेक्चर…”

कार्तिक व कियारा या चित्रपटासाठी पहिली पसंती असलेले कलाकार होते का? असा प्रश्न विचारल्यावर समीर विद्वांस इंडिया टुडेशी बोलताना म्हणाला, “होय, सत्तू आणि कथाच्या भूमिकेसाठी कार्तिक-कियारा पहिली निवड होते. दोघांची केमेस्ट्री उत्तम आहे. कार्तिक आमची पहिली निवड होता कारण सत्तूमध्ये असलेली निरागसता कार्तिकच्या हास्यात आहे. तो उत्तम अभिनेता आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कियाराचे काम मी याआधी पाहिले आहे आणि मला नेहमीच तिचं काम आवडतं. तिच्यामध्ये खूप ताकद आहे जी कथाच्या पात्रासाठी आवश्यक होती. मला वाटत नाही की इतर कोणीही कथाचे पात्र कियाराप्रमाणे साकारू शकलं असतं. तिने या भूमिकेसाठी केलेला शांत, संयमी अभिनय आश्चर्यकारक आहे,” असं समीरने सांगितलं.