बॉलिवूड किंवा एकंदरच चित्रपटसृष्टीत अभिनयापेक्षा शारीरिक सौंदर्याला महत्त्व दिलं जातं हे सत्य आहे. आज कित्येक अभिनेत्री या आघाडीवर असल्या तरी प्रत्येक अभिनेत्रीला या गोष्टीचा सामना कधी ना कधीतरी करावा लागलाच आहे. मग काही अभिनेत्री सर्जरीसारखे पर्याय निवडतात आणि शरीरात हवे तसे बदल करून घेतात, तर काही अभिनेत्री या केवळ अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. अशाच काही अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे दिव्या दत्ता.

सदैव आपल्या वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या दिव्या दत्ताच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होतं. नुकतंच दिव्याने ‘दी लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन द न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली अन् मोनमोकळ्या गप्पा मारल्या. या मुलाखतीदरम्यान चित्रपटक्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवांबद्दल तसेच मिळालेल्या नकारांबद्दल भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये दिव्याने तिला तिच्या वजनावरूनही बोलणाऱ्या लोकांबद्दल भाष्य केलं.

आणखी वाचा : “बाबूजी, तुमच्या स्वरातील आर्ततेला सलाम…”, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा नवा टीझर प्रदर्शित

याविषयी बोलताना दिव्या म्हणाली, “या इंडस्ट्रीमध्ये राहताना, वावरताना मी हळूहळू नकार पचवायला शिकले, शिवाय चित्रपटातून काढून टाकलं जाणं याचं दुःखदेखील मी हळूहळू पचवू लागले. आयुष्य तुम्हाला या सगळ्या गोष्टी पचवायला शिकवते. माझ्याकडे जेव्हा काही काम नव्हते तेव्हा मी काम मागण्यासाठी निर्मात्यांचे उबरे झिजवायचे, पण त्यांच्या टिपिकल हिरॉईनच्या साच्यात मी कधीच फिट बसणार नव्हते याची जाणीव मला झाली नव्हती. एकेदिवशी मी तब्बल २२ चित्रपट साईन केले, काही चित्रपटांचे मला टोकनही मिळाले, तेव्हा मला कुणीच नाही म्हंटलं नाही, पण नंतर माझ्या ध्यानात आलं की त्या २२ पैकी केवळ दोनच चित्रपट हे पुढे गेले ज्यात मी नायिका म्हणून नव्हते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे दिव्या म्हणाली, “अशाप्रकारे मला बऱ्याच चित्रपटातून बाजूला काढलं गेलं. एकेदिवशी तर मी एका चित्रपटाच्या सेटवर गेले तेव्हा माझं वजन कमी झाल्याने मला यातून काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यावेळी माणुसकीवरुन माझा विश्वास उडाला. याचं मला फार वाईट वाटायचं, शरीरावरुन एखाद्याच्या योग्यता ठरवणं हे काही बरोबर नाही.” दिव्याचा नुकताचा ‘अंत द एंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शिवाय तिने ‘वीर जारा’ ‘दिल्ली ६’, ‘भाग मिल्खा भाग’ ‘धाकड’ या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका निभावली आहे.