बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटातून पुनरागमन केल्यानंतर काजोल आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्वतःच्या अदाकारीची छाप लोकांवर सोडत आहे. नुकताच काजोलच्या आगामी ‘ द ट्रायल’ या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि लोकांच्या तो चांगलाच पसंतीस पडला. काजोलची ही सीरिज ‘द गुड वाईफ’ या इंग्रजी वेब सीरिजवर बेतलेली असून तिची निर्मिती काजोलचा पती अन् बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनेच केली आहे.

या वेब सीरिजमध्ये काजोल नोयोनिका सेनगुप्ता नावाच्या वकिलाची भूमिका निभावत आहे जिचा पती एका मोठ्या संकटात सापडला आहे. एक सशक्त महिलेची भूमिका काजोल साकारत आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी काजोल आणि अजय देवगण यांनी एका इव्हेंटमध्ये उपस्थिती लावली.

आणखी वाचा : नग्न महिलेच्या शरीरावर ‘सुशी’च्या प्लेट्स अन्…; रॅपर कान्ये वेस्टच्या पार्टीतील ‘या’ प्रकारावर नेटकरी नाराज

या इव्हेंटमध्ये काजोल आणि अजय देवगणला बरेच प्रश्न विचारले गेले. दरम्यान अजय देवगणलाही एक भन्नाट प्रश्न विचारण्यात आला की घरातील सगळे महत्त्वाचे निर्णय काजोल घेते का? या प्रश्नाचं अभिनेत्याने भन्नाट उत्तर दिलं. पहिले काजोल या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली की “असं अजिबात नाही, या प्रश्नाचं उत्तर मी देते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर अजय देवगणने त्या रिपोर्टरला प्रश्न केला की त्याचं लग्न झालं आहे का? यावार काजोललाही हसू आलं. अजयच्या प्रश्नाचं उत्तर देताना रिपोर्टरने त्याचं लग्न झाल्याचं कबूल केलं. त्यावर अजय देवगण म्हणाला, “मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हीही देऊ शकता, ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्या सगळ्यांचे उत्तर सारखंच असणार आहे.” यावर एकाच हशा पिकला. काजोलची आगामी सीरिज सुपर्ण वर्मा यांनी दिग्दर्शित केली आही. १४ जुलैपासून ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.