Esha Deol’s divorce made Dharmendra sad: ‘अंधा कानून’, ‘सम्राट’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘बटवारा’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र अनेकदा चर्चेत असतात.

धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याबाबतही अनेकदा चर्चा होताना दिसते. प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलेले असताना त्यांनी १९८० मध्ये हेमा मालिनी यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांना ईशा व अहाना देओल अशा दोन मुली आहेत.

ईशा देओलच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे दु:खी झालेले धर्मेंद्र

धर्मेंद्र व हेमा मालिनी यांनी ईशा देओलचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात केले होते. २०१२ मध्ये ईशा देओलने उद्योगपती भरत तख्तानीबरोबर लग्नगाठ बांधली होती. मात्र, लग्नाच्या ११ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. २०२४ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ईशा व भरत तख्तानीने ते वेगळे होणार असल्याची घोषणा केली होती, त्यावेळी चाहत्यांना धक्का बसला होता.

ईशा देओल व भरत तख्तानी यांनी घटस्फोटाच्या निवेदनात स्पष्ट केले होते की, त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जरी ते वेगळे होत असले तरी मुलींचे संगोपन ते एकत्र करणार आहेत. मुलींचे हित त्यांच्यासाठी सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे. ईशा व भरत यांना राध्या व मिराया अशा दोन मुली आहेत.

काही रिपोर्टनुसार, भरत व ईशा यांच्या या निर्णयाने धर्मेंद्र यांना मोठा धक्का बसला होता. त्यांना असे वाटत होते की, ईशा व भरत यांनी त्यांच्या या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा.

२०२४ मध्ये बॉलीवूड लाइफने रिपोर्ट दिला होता. त्यांनी असे म्हटले होते, “आपल्या मुलांचा संसार मोडत आहे, हे पाहून कोणत्याही पालकांना चांगले वाटणार नाही. धर्मेंद्रसुद्धा एक वडील आहेत. त्यांचे दु:ख कोणालाही समजणार नाही. याचा अर्थ असा नाही की, ते त्यांच्या मुलीच्या निर्णयाविरुद्ध आहेत. पण, त्यांना वाटते की, तिने तिच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा.”

काही रिपोर्टससार, धर्मेंद्र यांना असे वाटत होते की, ईशाची मुले दोन्ही बाजूंच्या आजी आजोबांच्या जवळ आहेत. जर आई-वडील वेगळे झाले, तर त्याचा मुलांवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे त्यांनी जर विचार केला, तर ते त्यांचे लग्न वाचवू शकतात.

दरम्यान, भरत तख्तानीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल फोटो शेअर केले. तो मेघना लखानीला डेट करीत आहे.