Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘आश्रम ३’ या वेबसीरिजमुळे ती चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ईशा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिच्या या बोल्ड इमेजमुळे तिचा एक मोठा चाहतावर्ग सोशल मीडियावर तयार झाला आहे.

नुकतंच ईशाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका इवेंटमध्ये ईशाने पांढऱ्या रंगाचा मिडी बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. या इवेंटदरम्यान ईशा तिच्या या ड्रेसमध्ये अत्यंत बोल्ड अंदाजात वावरताना दिसत होती. ईशचा हा ड्रेस पारदर्शक आहे. यामुळेच ती चर्चेत आली आहे.ि

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
virar Sand Mafia, Sand Mafia active
वसई विरार : खाडी किनारी वाळू माफिया सक्रिय, भरारी पथकाची कारवाई, ४ बोटी केल्या नष्ट
Revenge Porn in Khamgaon
खामगावात ‘रिव्हेंज पॉर्न’चे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ, सायबर विभागाची करडी नजर
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

आणखी वाचा : पुण्यातील ए आर रेहमान यांचा शो पोलिसांनी थांबवला; मंचावर येऊन अधिकाऱ्यांनी सुनावले खडेबोल

या कार्यक्रमात ईशा बऱ्याच लोकांना भेटत आहे तसेच ती तिच्या कित्येक चाहत्यांसह सेल्फी आणि फोटोदेखील काढताना आपल्याला दिसत आहे. तिच्या या ड्रेसमुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. “घरातून निघताना आरशात स्वतःला बघता की नाही?”असा सवाल एका युझरने केला आहे. तर एका व्यक्तीने कॉमेंटमध्ये लिहिलं की, “ओ ताई थोडीतरी लाज बाळगा!” एका व्यक्तीने ईशाला विचारलं की “तुला थंडी वाजत आहे का?” तर एका युझरने लिहिलं की “बोल्ड आणि सेक्सी दिसण्यासाठी हे असं करणं आवश्यक आहे का?”

२०१२ साली इम्रान हाश्मीच्या ‘जन्नत २’ या चित्रपटातून ईशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याबरोबरच तिने ‘बादशाहो’, ‘रुस्तम’, ‘राझ ३डी’ अशा चित्रपटातही काम केलं आहे. चित्रपटसृष्टीत येण्याआधी ईशाने मिस इंडिया स्पर्धेत सहभागही घेतला होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आश्रम ३’ या वेबसीरिजमध्ये ईशाची खूप बोल्ड भूमिका होती.