तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पुन्हा नवीन उलगडा झाला आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याच्या खून झाल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या अधिकाऱ्याचं सुशांतची हत्या झाल्याचं म्हणणं आहे.

कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांत सिंह राजपूतचे पोस्टमॉर्टम करणारे रूपकुमार शाह यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. यानंतर या प्रकरणातील बऱ्याच गोष्टी समोर येत असताना बिहारचे भतपूर्व डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनीसुद्धा या प्रकरणावर टिप्पणी केली आहे. त्यावेळी सुशांतच्या आत्महत्येच्या केसची जबाबदारी त्यांच्याकडेच होती.

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

आणखी वाचा : ‘शार्क टँक इंडिया २’मध्ये येण्यास उत्सुक नव्हते पियुष बन्सल; म्हणाले “मी हा शो करणार नव्हतो…”

एएनआयशी संवाद साधताना गुप्तेश्वर म्हणाले, “महाराष्ट्रात नवीन सरकार आलं आहे त्यामुळे लवकरच सत्य जनतेसमोर येईल अशी आशा करुयात. या प्रकरणात SIT ची नियुक्ती झालेली आहे. तेसुद्धा त्यांच्या परीने या प्रकरणाची चौकशी करतील.” शिवाय सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी बिहारकडून पाठवलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना योग्य सहकार्य केलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही तर कोविड असल्याने quarantine चं कारण देऊन बिहारवरून आलेल्या तपास करणाऱ्या अधिकाऱ्यालाही मुंबई पोलिसांनी डांबून ठेवल्याचा आरोप गुप्तेश्वर यांनी केला आहे.

आणखी वाचा : “१ जूनला आम्ही ग्रुप बनवला अन् १४ दिवसांनी…” सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना प्रार्थना बेहरेने व्यक्त केली खंत

याविषयी बोलताना ते म्हणाले, “मला आणि माझ्या टीमला तपास करण्यासाठी पुरेसा वेळच दिला गेला नाही. जर मला १५ दिवस दिले असते तर नक्कीच या केसचा छडा आम्ह लावला असता. तपासादरम्यान मुंबई पोलिस आमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवायचा प्रयत्न करत होती.” गुप्तेश्वर पांडे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. शिवाय या केसमध्ये आणखी काय काय बाहेर येणार ते येणारी वेळच ठरवेल.