२०२३ चा पहिला सुपरहीट चित्रपट देणारा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’नंतर शाहरुख खानचे ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे दोन्ही चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या शाहरुख खानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाच्या सेटवरून हे फोटोज लीक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डँकी’मध्ये तो या लूकमध्ये दिसणार असल्याचे शाहरुखच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. पण या खोट्या गोष्टी आहेत. हे १२ वर्षे जुने फोटो आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये शाहरुख सरदारच्या लूकमध्ये दिसत आहे. हिरवा शर्ट-पँटबरोबर त्याने डोक्यावर पगडी घातली आहे. हा फोटो त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधील असावा. जिथे त्याचा मेकअप सुरू होता.

आणखी वाचा : सुपरस्टार सूर्याच्या वाढदिवसाला लागलं गालबोट; शुभेच्छांचा फलक लावताना अभिनेत्याच्या दोन चाहत्यांचा मृत्यू

शाहरुख हातात सिगारेट घेऊन आरशासमोर बसला आहे. एक माणूस आपली पगडी फिक्स करत आहे. दुसऱ्या चित्रात तो त्याचा फोन बघताना दिसत आहे. १२ वर्षांपूर्वी एका टुथपेस्ट कंपनीच्या जाहिरातीसाठी शाहरुखने शूटिंग केलं होतं, त्यादरम्यानचा हा त्याचा लूक आहे. सोशल मीडियावर हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ हा चित्रपटातही पंजाबी माणसाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. ‘डंकी’मध्ये शाहरुखबरोबर तापसी पन्नू, विकी कौशलदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून याच्या पोस्ट प्रोडक्शनवर काम सुरू आहे. २२ डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.