शाहरुख खान गेले अनेक दिवस त्याच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून तो चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. त्याला या चित्रपटात पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. विविध प्रकार येथे त्यांची उत्सुकता आणि त्यांचं शाहरुख बद्दलचं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचवत असतात. तर काल रात्री त्याची एक झलक पाहण्यासाठी ‘मन्नत’बाहेर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. हा जमाव इतका होता की शाहरुखला स्वतः माफी मागावी लागली.

शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच आतुर असतात. त्यासाठी ते त्याच्या वाढदिवशी ‘मन्नत’बाहेर येतात. पण आता ‘पठाण’ चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा द्यायला चाहते काल त्याच्या घराबाहेर जमले होते. त्यांच्या प्रेमाखातर शाहरुखही टेरेसवर आला आणि त्याची झलक चाहत्यांना दाखवली. त्याचबरोबर चाहत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छांचा त्याने स्वीकार केला आणि सर्वांचे आभारही मानले.

आणखी वाचा : “आमच्या मुलीचं नाव तू ठेव,” चाहत्याच्या मागणीवर शाहरुख खानने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाला…

या वेळेचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. यात चाहते त्याच्या घरासमोर जमून टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात त्याबद्दलचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. त्याच्या घराबाहेर जमलेली चाहत्यांची गर्दी एवढी होती की त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं, “या सुंदर रविवार संध्याकाळबद्दल तुमचे मनापासून आभार. मला माफ करा. पण मला आशा आहे की, त्या लाल गाडीत बसलेल्यांनी सीट बेल्ट लावला होता. ‘पठाण’ची तिकिटे बुक करा. पुढच्या वेळी मी तुम्हाला तिथेच भेटेन.”

हेही वाचा : Video: “नाही, मी तर…” शाहरुखला ‘तृतीयपंथी’ म्हणणाऱ्याला किंग खानचं सडेतोड उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता त्याचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आला आहे. त्यावरही त्याचे चाहते प्रतिक्रिया आधी त्याच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करत आहेत. शाहरुख आणि दीपिका यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या ब्रेकनंतर शाहरुखला चित्रपटात पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक झालेले आहेत.