Farah Khan on Kajol: अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची, सिनेमातील गाण्यांची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.
फराह खान काय म्हणाली?
चित्रपटाबरोबरच फराह खानच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये अजय देवगण व फराह खान त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही बोलताना दिसले. फराह खानने काजोल पतीव्रता असल्याचे म्हटले. तिने अजय देवगणला काजोलचा एक किस्सा सांगितला.
साजिद खानने दिग्दर्शित केलेल्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी काजोलला सेटवर पाहिले होते. ती अजयसाठी जेवण बनवत होती. ती पतीव्रता आहे. ती जेव्हा अजयबरोबर असते, तेव्हा खूप वेगळी असते. इतरवेळी ती खूप बोलत असते. ती उत्तम पत्नी आहे”, असे म्हणत फराह खानने काजोलचे कौतुक केले.
फराहच्या बोलण्यावर अजय देवगण गमतीने म्हणाला की असं काही नाही. पुढे तो असेही म्हणाला की, मी चित्रपटांची निर्मिती करत आहे, जेणेकरून काजोल घराबाहेर जास्त वेळ राहू शकेल. मी माझे प्रयत्न करत आहे.
काजोल आणि अजय देवगण यांनी १९९० च्या दशकात एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. १९९९ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुले आहे. मुलीचे नाव न्यासा असे आहे, तर मुलाचे नाव युग असे आहे. सोशल मीडियावर अजय व काजोलची मुलगी न्यासा मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.
काजोलच्या कामाबद्दल बोलायचे तर काही दविसांपूर्वीच ती ‘माँ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता भविष्यात ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचे तर काही महिन्यांपूर्वी तो ‘रेड २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात रितेश देशमुखही प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ने पहिल्या दिवशी ६. ७५ कोटींची कमाई केली आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘सन ऑफ सरदार २’चे दिग्दर्शन विजय अरोरा यांनी केले आहे.