Farah Khan Reveals SRK & Kajol’s song Gerua Budget : फराह खान बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शिका व कोरिओग्राफर आहे. आजवर तिनं अनेक लोकप्रिय कलाकारांना डान्स शिकवला आहे आणि अनेक गाजलेल्या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. अशातच आता नुकतंच तिनं शाहरुख खान व काजोल यांच्या गाजलेल्या गाण्याबद्दल सांगितलं आहे.
फराह खान तिच्या यूट्यूब चॅनेलवरून अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर वेगवेगळे पदार्थ बनवत असते. त्यादरम्यान ती त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी सांगत असते. आता नुकतीच ती ‘शार्क टँक इंडिया’चे माजी जज व ‘भारतपे’चे सहसंस्थापक अशनीर ग्रोवर यांच्या घरी गेली होती. त्यावेळी फराहनं अशनीर व त्यांची पत्नी माधुरी यांच्याबरोबर संवाद साधला. शाहरुख खान व काजोल यांच्या ‘गेरुआ’ या गाजलेल्या गाण्याबद्दल सांगितलं आहे.
गेरुआ गाण्याच्या बजेटबद्दल फराह खानचा खुलासा
फराह खाननं दिग्दर्शन केलेलं ‘गेरुआ’ हे गाणं आइसलँड (Iceland) येथे चित्रित करण्यात आलं होतं. त्याबद्दल तिनं तिच्या ब्लॉगमधून सांगितलं आहे. ती म्हणाली, “आइसलँड खूप महागडी जागा आहे. आम्ही फक्त दोन लोकांबरोबर तिथे शूटिंग केलं; पण त्या एका गाण्यासाठी तब्बल सात कोटींचं बजेट होतं. आइसलँड खरंच खूपच महागडी जागा ठरली.”
‘गेरुआ’ गाण्याबद्दल बोलायचं झालं तर, ‘गेरुआ’ हे गाणं शाहरुख खान व काजोल यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं आणि हे आजवरच्या बिग बजेट असलेल्या गाण्यांपैकी एक आहे. पण, हे गाणं चित्रित करताना फराह खानसह शाहरुख खान, काजोल आणि टीममधील लोकांना बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं.
‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’च्या यूट्यूब चॅनेलवर हे गाणं चित्रित करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामधून चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी, फराह खान, शाहरुख खान, काजोल व टीममधील इतर क्रू मेंबर यांना किती आव्हानांना सामोरं जावं लागलं, तसंच ते गाणं कसं चित्रित झालं ते पाहायला मिळतं. ‘गेरुआ’ हे गाणं काजोल व शाहरुखच्या ‘दिलवाले’ चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांपैकी एक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं होतं.
दरम्यान, फराह खाननं तिच्या या नवीन यूट्यूब ब्लॉगमधून अशनीर ग्रोवरला ‘शार्क टँक इंडिया’मधील त्यांच्या अनुभवाबद्दल, तसेच त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल विचारलं. यावेळी अशनीर ग्रोवर व त्यांच्या पत्नी माधुरी यांनी त्यांच्या घराची झलकदेखील या ब्लॉगमधून दाखवली आहे.