बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने दमदार कमाई केली होती. २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता. आत्तापर्यंत डॉनचे दोन भाग आले आहेत. प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. दिग्दर्शक फरहान अख्तरने ‘डॉन ३’ ची घोषणा केली आहे.

हेही वाचा- अमीषा पटेलला ट्रोल करणाऱ्यांना सनी देओलने सुनावलं; म्हणाला, “परदेशी संस्कृतीने प्रभावित…”

फरहानने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत ‘डॉन ३’ ची घोषणा केली आहे. ‘पिंकव्हीला’च्या एका वृत्तानुसार शाहरुख खानने ‘डॉन ३’मध्ये काम करण्यास साफ नकार दिला आहे. शाहरुख खान सध्या कमर्शियल चित्रपट करण्यास जास्त उत्सुक आहे जो जगभरातील प्रेक्षक बघणं पसंत करतील आणि ‘डॉन ३’ या साच्यात न बसणारा चित्रपट असल्याने शाहरुखने स्वतःला या चित्रपटातून बाहेरच ठेवायचा निर्णय घेतला आहे.

फरहानच्या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. शाहरुख खानशिवाय डॉन ३ बनू शकत नाही, अशी कमेंट चाहत्यांनी केली आहे. एका यूजरने लिहिले “थोडी लाज बाळगा शाहरुखबरोबर चित्रपट का केला नाही?” तर दुसऱ्याने लिहिले “नो एसआरके नो डॉन”. एका यूजरने लिहिले “मला माझा SRK डॉन परत द्या.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार डॉन ३ मधील मुख्य अभिनेता म्हणून रणवीर सिंगच्या नावाची घोषणा लवकरच होऊ शकते. गदर २ आणि OMG २ च्या रिलीजसह डॉन ३ टीझरही प्रदर्शित करण्याचा विचार चित्रपट निर्माते करत आहेत. संजय लीला भन्साळीच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाचे शूटिंग संपवून रणवीर सिंग डॉन ३ च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. डॉन ३ मधून फरहान पुन्हा दिग्दर्शनात पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.