scorecardresearch

“माझा फोन घेतला, पालकांना मारण्याची धमकी दिली अन् चेहऱ्यावर…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने केला घरगुती हिंसाचाराचा खुलासा

श्रद्धा वालकर प्रकरणानंतर अभिनेत्रीला झाली एक्स-बॉयफ्रेंडकडून झालेल्या छळाची आठवण

“माझा फोन घेतला, पालकांना मारण्याची धमकी दिली अन् चेहऱ्यावर…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने केला घरगुती हिंसाचाराचा खुलासा
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘स्त्री’ फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीने तिच्याबरोबर झालेल्या घरगुती हिंसाचाबद्दल एका मुलाखतीत सांगितलंय. तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडून झालेल्या घरगुती हिंसाचार आणि लैंगिक छळाबद्दल भाष्य केलं. २०१८ मध्ये MeToo चळवळीदरम्यान तिच्या एक्स बॉयफ्रेंडने केलेल्या गैरवर्तनाबद्दल फ्लोरा पहिल्यांदा सार्वजनिकपणे बोलली होती. आता त्याने जवळजवळ तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, याबद्दल खुलासा केलाय. तिच्याबरोबर हे गैरवर्तन २००७ मध्ये झालं होतं.

‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, फ्लोरा म्हणाली की तिने चित्रपट निर्माता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड गौरांग दोषी यांच्याबरोबर राहण्यासाठी तिचं घर सोडलं होतं. कारण त्याने तिला त्याच्यावरील प्रेम सिद्ध करण्यास सांगितलं होतं. तो सुरुवातीला इतका चांगला वागत होता की तिचे पालकही त्याच्या बोलण्यात अडकले होते. अलीकडेच घडलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणानंतर तिला तिच्याबरोबर घडलेल्या गैरवर्तणुकीची आठवण झाली. “मी कुणालाही फोन करू नये, म्हणून गौरांगने आपला फोन काढून घेतला होता,” असा खुलासाही फ्लोराने केला.

हेही वाचा – ‘गदर’ चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मानेही केलं होतं काम, शूटिंगदरम्यान क्रू मेंबर्सनी शिव्या दिल्या अन्…

फ्लोरा म्हणाली, “असे लोक सर्वात आधी तर तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर करतात. मीही माझं घर सोडलं आणि त्याच्याबरोबर राहायला गेले होते. पण एका आठवड्याच्या आतच त्याने माझा छळ सुरू केला. तो मला अचानक का मारत होता, हेच मला कळायचं नाही, कारण माझ्या नजरेत तो खरोखर चांगला माणूस होता. माझ्या पालकांनी मला समजावलं होतं, पण त्यांचंही न ऐकता मी त्याच्याबरोबर राहायला गेले होते. मी त्याला सोडण्याबद्दल बोलले तेव्हा त्याने माझ्या पालकांना मारण्याची धमकी दिली होती,” असं फ्लोरा न्यूज18शी बोलताना म्हणाली.

हेही वाचा – “आता सर्व प्रश्न…” ‘तारक मेहता’ फेम राज अनाडकतने मालिका सोडल्याच्या चर्चांवर सोडलं मौन

“एका रात्री त्याने मला इतका मारहाण केली की माझा जबडा फ्रॅक्चर झाला. त्याने त्याच्या वडिलांचा फोटो घेतला आणि मला म्हणाला की मी माझ्या वडिलांची शपथ घेतो की आज रात्री मी तुला मारून टाकीन. फोटो फ्रेम ठेवण्यासाठी तो मागे वळला तेव्हा एका सेकंदात मला माझ्या आईचा आवाज आल्याचा भास झाला आणि मी तिथून बाहेर पडायचं ठरवलं. कपडे काय घातलेत, पैसे आहेत की नाही, या कशाचाही विचार करू नकोस, तू फक्त तिथून बाहेर पड, हा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर मी तिथून पळत निघाले आणि आई-वडिलांजवळ गेले. मग मी कधीच त्याच्याकडे परत न जाण्याचा निर्णय घेतला,” असं फ्लोरा म्हणाली.

हेही वाचा – “…म्हणून मी ‘कांतारा’सारखा चित्रपट कधीच बनवणार नाही”; ‘तुंबाड’शी तुलना झाल्यावर दिग्दर्शकाने मांडलं स्पष्ट मत

त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी कुटुंबाबरोबर आपल्या एक्स बॉयफ्रेंडविरोधात तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेल्याचं तिने सांगितलं. पण त्यावेळी पोलिसांनी तिची तक्रार नोंदवण्यास नकार दिला होता, असंही ती म्हणाली. दरम्यान, फ्लोराने आतापर्यंत ‘लव्ह इन नेपाल’, ‘दबंग टू’, ‘लक्ष्मी’, ‘धनक’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 19:12 IST

संबंधित बातम्या