शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट यापूर्वी २ जूनला रिलीज होणार होता, परंतु काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता ‘जवान’ चित्रपट नव्या तारखेनुसार ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु ‘जवान’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल केल्यापासून बॉलीवूडमधील इतर चित्रपटांचे निर्माते सतर्क झाले आहेत.

शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने जगभरात चांगली कमाई केली. तसेच ‘जवान’ चित्रपटाची चर्चासुद्धा गेल्या काही महिन्यांपासून सतत सुरू आहे. ‘पठाण’ या चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट मोडेल असा दावा अनेकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर इतर कलाकार आणि बिग बजेट सिनेमांचे निर्माते सतर्क झाले आहेत. ‘फुक्रे’ (२०१३), ‘फुक्रे रिटर्न्स’ (२०१७) नंतर ७ सप्टेंबरला ‘फुक्रे ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, परंतु ‘जवान’ची नवी रिलीज डेट ऐकल्यावर ‘फुक्रे ३’च्या निर्मात्यांनीसुद्धा चित्रपट पुढे ढकलला आहे.

हेही वाचा : ‘जवान’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे का ढकलली? शाहरुखने स्वत: सांगितले कारण, म्हणाला…

या वर्षी जानेवारीमध्येच चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केली होती की, ‘फुक्रे’ या हिट कॉमेडीचा तिसरा भाग ७ सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होईल. पण आता ‘फुक्रे ३’ हा चित्रपट, २४ नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे.

हेही वाचा : “‘जवान’मध्ये शरीरावर इतक्या पट्ट्या का बांधल्या आहेत?” चित्रपटातील लूकबद्दल शाहरुख खानचा मोठा खुलासा, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘फुक्रे’ चित्रपटाच्या याआधी प्रदर्शित झालेल्या भागांमध्ये चार मित्रांची कथा दाखविण्यात आली असून या मित्रांना सहज पैसे कमवायचे असतात. ‘फुक्रे ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा करत आहेत. यापूर्वीच्या दोन्ही भागांचे दिग्दर्शनसुद्धा त्यांनीच केले आहेत. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.