सनी देओल आणि अमिषा पटेलचा बहुचर्चित चित्रपट गदर २ शुक्रवार (११ ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला आहे. २००१ मध्ये आलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. गदर २ ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४० ते ४५ करोड रुपयांची कमाई केली आहे.

या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २० लाख तिकिटे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये विकली गेली होती. पठाणनंतर हा वर्षातील सर्वात मोठा दूसरा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार याच्या प्रमोशनसाठी सध्या देशभरात फिरताना दिसत आहे.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर ‘जेलर’चा डंका; रजनीकांत यांच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कमाईचा ‘हा’ टप्पा पार

बऱ्याच वर्षांनी सनी देओलला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. मात्र आता एका व्हिडीओमुळे सनी देओल पुन्हा चर्चेत आले आहेत. विमानतळावर एका चाहत्याला सेल्फी देताना सनी देओल चांगलाच चिडल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘गदर २’च्या प्रमोशनसाठी सनी सध्या वेगवेगळ्या शहरात फिरत. त्याचदरम्यान एका विमानतळावर घडलेला हा प्रसंग सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सनी देओल हा त्याच्या अंगरक्षकांसह विमानतळावरुन जात असताना त्याला एका चाहत्याने सेल्फीसाठी थांबवले. सेल्फीसाठी सनीने पोजदेखील दिली, पण फोटो काढायला जरा वेळ लागत असल्याने सनी त्या चाहत्यावर भडकला आणि तिथून थेट निघून गेला. त्या चाहत्याने पुन्हा सनीकडे सेल्फीसाठी विचारणा केली असता त्याच्या अंगरक्षकांनी त्याला दूर केले. हा व्हिडीओ पाहून काहींनी सनीच्या अशा वर्तणूकीवर टीका केली आहे तर काहींनी त्या चाहत्याला मूर्खात काढलं आहे.