बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. यात मराठमोळा अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुरामची भूमिका साकारत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरच्या सुरवातीलाच गांधी हत्येचा सीन दाखवण्यात आला आहे, त्यानंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. मात्र यात एक वेगळा प्रयोग केला गेला आहे तो म्हणजे नथुराम आणि गांधी यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवले आहेत. टीझरमध्ये ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. ज्यात नथुराम महात्मा गांधींवर आरोप करतो की, “तुमच्याकडेदेखील एक मोठे हत्यार आहे ते म्हणजे आमरण उपोषण तुम्ही सतत उपोषण करून लोकांना तुमच्यकडे वळवता हीदेखील एक मानसिक हिंसा आहे,” असा आरोप तो करतो. टीझरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सारा वल्लभाई पटेल यांची झलक पाहायला मिळते. टीझरला तितकेच उत्कृष्ट असे पार्श्वसंगीत देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandhi godse ek yudh film teaser out rajkumar santoshi directing this film spg
First published on: 02-01-2023 at 18:31 IST