‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे अभिनेत्री गौतमी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली. आपली मोठी बहीण मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवत तिने कलाविश्वात पदार्पण केलं. देशपांडे बहिणींच्या जोडीची सिनेसृष्टीत नेहमीच चर्चा असते. नुकताच गौतमीचा विवाहसोहळा पार पडला. अभिनेत्रीने क्रिएटर स्वानंद तेंडुलकरशी २५ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नातील बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या गौतमीने शेअर केलेल्या एका नव्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गौतमी अभिनयाबरोबरच उत्तम गाते हे आपल्याला ठाऊक आहेच. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर असे बरेच व्हिडीओज पोस्ट केले आहेत ज्यात तिने गाणे सादर केले आहे. आता नुकतंच तिने अशीच एक पोस्ट शेअर करत लता मंगेशकर यांचं एक जुनं अजरामर गाणं सादर केलं आहे. गौतमीने लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘सुनो सजना’ हे गाणं गात व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे
Kangana Ranut Old Video viral
“कंगना, तू उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं त्याचं काय?”, अश्लील पोस्ट प्रकरणानंतर ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

आणखी वाचा : “त्याच्याकडे १७ फोन आहेत पण…”, चार वर्षांत फोन न करणाऱ्या शाहरुख खानबद्दल विवेक वासवानी यांनी व्यक्त केली खंत

गौतमीचं हे गाणं तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. तिच्या चाहत्यांनी कॉमेंट करत तिच्या या गाण्याची प्रशंसा केली आहे. “तुझं प्रोफेशन चुकलं आहे.” असं एक युझरने कॉमेंट करत तिच्या गायकीची प्रशंसा केली आहे. तर बऱ्याच लोकांनी इतरही काही गाण्यांची फर्माईश गौतमीकडे केली आहे. हे गाणे फार कठीण आहे तरी गौतमीने उत्तमरित्या सादर केले आहे असंही बऱ्याच चाहत्यांनी कॉमेंट करत सांगितलं आहे.

gautami-deshpande-instagram
फोटो : सोशल मीडिया

गौतमी देशपांडेने ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. स्वानंद तेंडुलकरशी लग्न केल्यानंतर गौतमी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. याबरोबरच गौतमीचे तिची बहीण व अभिनेत्री मृण्मयी देशपांडे बरोबरचे मजेशीर व्हिडीओजही सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती अभिनेता विराजस कुलकर्णीबरोबर ‘गालिब’ या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहे.