रितेश देशमुख आणि जिनिलीया यांची जोडी मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अनेकवर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधून आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना रितेश-जिनिलीया आवर्जुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात.

आज जिनिलीयाने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री लिहिते, “प्रिय पॉप्स, जेव्हा मला एकटं किंवा असुरक्षित वाटतं तेव्हा मी डोळे बंद करून तुमचा विचार करते… तेव्हा मला फक्त तुमची आठवण येते. कारण, माझ्या वडिलांसारखं प्रेम माझ्यावर इतर कोणीही करू शकत नाही. तुम्हाला वाटतंय त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त माझं तुमच्यावर प्रेम आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पॉप्स!”

हेही वाचा : शाहरुख खान : ४ वर्षांच्या ब्रेकनंतर ‘पठाण’ने बाजी पालटली अन् सांगितलं मीच खरा ‘बादशहा’!

जिनिलीयाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यापूर्वी लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवशी सुद्धा जिनिलीयाने रोमँटिक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

हेही वाचा : स्मृती इराणींनी मासिक पाळीबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर ‘झिम्मा २’चे कलाकार म्हणाले, “महिलांना चार दिवस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रितेश-जिनिलीयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या दोघांना महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणून ओळखलं जातं. यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रितेशने अलीकडेच त्याच्या बहुचर्चित ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाची घोषणा केली होती. तर दुसरीकडे, जिनिलीया शेवटची ‘ट्रायल पीरियड’ या चित्रपटात झळकली होती.