Know About artists who passed away in October: बॉलीवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, संगीत अशा विविध क्षेत्रातील काही लोकप्रिय कलाकारांचे ऑक्टोबर महिन्यात निधन झाले आहे. यामध्ये असरानी ते सतीश शाह अशा आठ कलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांबाबत जाणून घेऊ…
१. राजवीर जवंदा
प्रसिद्ध पंजाबी गायक राजवीर जवंदाचे ८ ऑक्टोबरला ३५ व्या वर्षी निधन झाले. राजवीर जवंदा बड्डी ते शिमला हा प्रवास मोटरसायकलवरून करत होता. दरम्यान, सोलन येथे भटक्या जनावरांमुळे त्याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला. त्यानंतर तो ११ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होता. समोर आलेल्या माहितीनुसार, त्याच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. राजवीरची ‘काली जवंदा दी’, ‘रब्ब करके’, ही गाणी लोकप्रिय ठरली होती.
२. वरिंदर सिंग घुमन
राजवीर जवंदाच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ ऑक्टोबरला बॉडीबिल्डर वरिंदर सिंगचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटक्याने त्याचा मृत्यू झाला. त्यांनी सलमान खानसोबत अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याने सलमान खानबरोबर काही चित्रपटात काम केले आहे. तो टायगर ३ मध्येदेखील दिसला होता.
३. पंकज धीर
पंकज धीर हे त्यांच्या महाभारतातील कर्ण या भूमिकेसाठी ओळखले जातात. १५ ऑक्टोबरला ६८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते दीर्घकाळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांची ही झुंज अपयशी ठरली.
४. असरानी
२० ऑक्टोबर रोजी, ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी निधन झाले. त्यांच्या शोलेमधील भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यांचे अनेक चित्रपट गाजले. गोवर्धन असरानी यांनी ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
५. ऋषभ टंडन
गायक व अभिनेता ऋषभ टंडनचे २२ ऑक्टोबर रोजी ४२ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने या गायकाचे निधन झाले.
६. पियुष पांडे
भारतीय जाहिरात उद्योगाचे पितामह म्हणून ओळखले गेलेले पियूष पांडे यांचे निधन २४ ऑक्टोबर रोजी झाले. ‘कुछ खास है हम सभी में’, ‘ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं’, ही लोकप्रिय घोषवाक्य त्यांनी लिहिली होती.
७.सचिन चांदवडे
‘जामतारा २’ फेम सचिन चांदवडेने आत्महत्या केली. तो २५ वर्षांचा होता. २३ ऑक्टोबरला त्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २४ ऑक्टोबरला रात्री दीडच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
८. सतीश शाह
ज्येष्ठ मनोरंजन अभिनेते सतीश शाह यांनी ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. २५ ऑक्टोबरला त्यांचे निधन झाले.
