Govinda-Sunita Ganpati Dance Video : संपूर्ण भारतात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कलाकार त्यांच्या घरी गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करत आहेत. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनीही त्यांच्या घरी बाप्पाचे स्वागत केले. आता त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये गोविंदा गणपती विसर्जनादरम्यान त्याच्या पत्नीबरोबर नाचताना आणि बाप्पाला निरोप देताना दिसत आहे. दोघांचाही हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये गोविंदाचा मुलगा बाप्पाला त्याच्या मांडीवर घेऊन विसर्जन करायला जात असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी बाप्पाला निरोप देताना गोविंदा आणि त्याची पत्नी ढोल ताशाच्या तालावर नाचताना दिसत आहेत. या दरम्यान, गोविंदा आणि त्याची पत्नी एकत्र खूप आनंदाने नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओवर वापरकर्त्यांकडून अनेक कमेंट्सही येत आहेत.

यापूर्वी सुनीता आहुजा यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्या गोविंदा, मुलगा यशवर्धन, त्यांची आई आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्याबरोबर गणपती बाप्पासमोर पोज देताना दिसल्या होत्या. फोटो पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘गणपती बाप्पा मोरया.’

घटस्फोटाच्या अफवांवर सुनीता काय म्हणाल्या?

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी गणेश चतुर्थीला एकत्र येऊन सिद्ध केले आहे की त्यांच्या घटस्फोटाची बातमी खोटी आहे आणि ते एकमेकांपासून वेगळे होत नाहीत. दरम्यान, सुनीता त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीबद्दलही बोलल्या. त्यांचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे, ज्यामध्ये त्या म्हणतात, ‘तुम्ही वाद ऐकण्यासाठी आला आहात की बाप्पाच्या दर्शनासाठी आला आहात.’ मग त्या आणि गोविंदा हसायला लागतात. पुढे सुनीता म्हणाल्या की, जोपर्यंत मी आणि गोविंदा स्वतःच्या तोंडून काही बोलत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये.

गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसले. अभिनेता मरून रंगाच्या कुर्त्यात दिसला. पत्नी मरून साडीत दिसली. गोविंदा आणि सुनीता यांचे लग्न १९८७ मध्ये झाले आहे.