Tina Ahuja Talks About Father Govinda : गोविंदा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. अलीकडेच गोविंदानेही त्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टींबद्दल प्रतिक्रिया दिलेली. अशातच आता त्याच्या लेकीनेही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

गोविंदाकडे बंदुकीचं लायसन्स आहे. गेल्या वर्षी त्याने चुकून स्वत:वरच गोळी घातल्याने त्याचा अपघात झालेला. त्याच्या पायावर चुकून त्याच्याकडून गोळी चालवण्यात आलेली. त्यावेळी अभिनेता चर्चेत आला होता. अशातच आता त्याची लेक टीना आहुजा हिने त्यावेळी काय घडलेलं याबद्दल सांगितलं आहे.

गोविंदाच्या लेकीची प्रतिक्रिया

‘फिल्मीग्यान’शी संवाद साधताना टीनाने त्या प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “मी त्यावेळी देवाकडे खूप प्रार्थना करत होते आणि नंतर माझ्या वडिलांना सुखरूप पाहून मला खूप बरं वाटलेलं.” पुढे तिने सांगितलं की, गोविंदा त्यावेळी कुठलीही औषधं घेत नव्हता, ती रात्रभर त्याच्याजवळ रुग्णालयात बसलेली असायची.

टीना याबद्दल म्हणाली, “आधी ते आयसीसीयूमध्ये होते, तेव्हा मी खाली झोपायचे. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आणि माझ्या वडिलांनी त्यावेळी कुठलीही औषधं घेण्यास नकार दिलेला. त्यांच्या या गोष्टींमुळे खूप चिडचिड व्हायची. जेव्हा एक व्यक्ती अशा अव्हानाला सामोरे जात असतो तेव्हा त्याला कळत नाही काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजं वगैरे आणि त्यावेळी मी अक्षरश: आयसीयूमध्ये झोपायचे. मला ते पुन्हा हवे होते.”

गोविंदाबद्दल टीना म्हणाली, “त्यावेळी जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा मीच त्यांना रुग्णालयात घेऊन गेले होते आणि त्यानंतर त्यांना कोलकात्तालाही जायचं होतं एका कार्यक्रमासाठी. सकाळची फ्लाइट होती. मी त्यांना म्हटलं हे सगळं तुम्ही केलेल्या कामाची पुण्याई आहे. की इतकं होऊनही तुम्ही पुन्हा नव्याने उभे आहात.”