बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून अभिनेते गुलशन ग्रोव्हर लोकप्रिय झाले. गुलशन ग्रोव्हर यांच्या मुलाने ‘हीर एक्सप्रेस’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संजय ग्रोव्हर हॉलीवूडमध्ये डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता, पण तो तिथलं करिअर सोडून भारतात परत आला. संजयच्या आईपासून गुलशन विभक्त झाले आहेत, तरीही संजय वडिलांबरोबर राहतो.
अर्चना पूरन सिंहशी गप्पा मारताना गुलशन यांनी मुलाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आपल्या मुलासाठी एक वारसा सोडून जायचंय आणि मुलाला यशस्वी होताना पाहायचंय, अशी इच्छा गुलशन यांनी व्यक्त केली. तुम्हाला एक व्यक्ती म्हणून लोकांनी कसं आठवणीत ठेवावं, असं वाटतं? असं परमीत सेठी यांनी गुलशन ग्रोव्हर यांना विचारलं. “मला माझा मुलगा संजयला खूप यशस्वी होताना पाहायचं आहे. संजय UCLA मध्ये शिकण्यासाठी गेला होता आणि एके दिवशी, माझी हॉलीवूड स्टुडिओ MGM मध्ये एक मीटिंग होती. संजयने माझ्याबरोबर यायची इच्छा व्यक्त केली, कारण त्याला त्यांच्या ऑफिसच्या लॉबीमध्ये असलेले सर्व ऑस्कर पहायचे होते,” असं गुलशन ग्रोव्हर म्हणाले.
त्याला बाहेर नेऊन मारावं वाटलं
एमजीएमच्या माजी सह-सीईओ मेरी पॅरेंटबरोबर एक मीटिंग झाली होती. या मीटिंगमध्ये संजय मेरीच्या बोलण्याच झालेल्या बैठकीत संजय तिच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करत होता. “हे पाहून कोणत्याही सामान्य पंजाबी वडिलांप्रमाणे, मलाही त्याला तिथून बाहेर नेऊन मारावं वाटलं होतं. पण, आश्चर्याची गोष्ट अशी की मीटिंगनंतर मेरीने त्याला तिच्याबद्दल सगळी माहिती दिली आणि सांगितलं की त्याचं पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला नोकरी देणार. त्यावेळी मला त्याचा खूप अभिमान वाटला आणि स्वतः मूर्ख असल्यासारखं वाटलं,” असं गुलशन म्हणाले.
गुलशन ग्रोव्हर यांचा मुलगा भारतात का परतला?
संजय हॉलीवूडमधील करिअर सोडून भारतात परत का आला? असं विचारल्यावर गुलशन म्हणाले, “मी त्याच्या आईपासून घटस्फोट घेतला आहे आणि ती वेगळी राहते. कोणत्याही आई-वडिलांना वाटतं की आपला मुलगा बऱ्याच वर्षांपासून बाहेर राहत आहे. आता पुरे. आता आपण एकत्र राहायला हवं. अगदी तसंच झालं. तो भारतात आला. आम्ही ठरवलं की तो माझ्या डुप्लेक्स घराच्या वरच्या मजल्यावर राहील आणि मी खालच्या मजल्यावर राहील. त्याला मी राहत येतो त्या मजल्यावर येण्याची मोकळीक आहे, पण मला तो राहतो तिथे जाण्याची परवानगी नाही.”
गुलशन यांनी पूर्वी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मुलाच्या अभिनेता होण्याच्या इच्छेबद्दल सांगितलं होतं. “हॉलीवूडमध्ये चित्रपट बनवण्याचा तसेच जागतिक चित्रपट पाहण्याचा त्याला मोठा अद्भुत आहे. तो जर्मन, फ्रेंच, अमेरिकन, कोरियन चित्रपट पाहतो. तो जितके चित्रपट पाहतो, तितके पाहण्यासाठी मला १० वर्षे लागतील. त्यामुळे त्याचा अनुभव आणि एक्सपोजर खूप जास्त आहे,” असं गुलशन मुलाचं कौतुक करत म्हणाले होते.
मुलाला भारतात परतण्यासाठी आणि अभिनयात नशीब आजमावण्यासाठी भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करावं लागलं होतं, असं गुलशन म्हणाले होते. संजयने हॉलीवूड स्टुडिओ एमजीएममध्ये काम केलं होतं. अलीकडेच त्याने ‘डियर जस्सी’ची सह-निर्मिती केली.