बॉलीवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या गोड स्वभावाने देखील ओळखला जातो. किंग खानच्या काळजीवाहू स्वभावाचे किस्से अनेकदा समोर आले आहेत. नुकतीच नवप्रीत कौर नावाची मॉडेल शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घरी मन्नतमध्ये गेली होती. यावेळी तिने मन्नतमध्ये चांगला वेळ घालवला आणि शाहरुखच्या संपूर्ण कुटुंबाचीही भेट घेतली. नवप्रीतने मन्नतमधील आपला अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

हेही वाचा- Video : कतरिना कैफबद्दल प्रश्न विचारताच आलियाने फिरवलेलं तोंड; ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले..

नवप्रीत कौरने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर शाहरुख खानसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. मन्नतमध्ये अभिनेत्याच्या कुटुंबासोबत घालवलेले क्षण त्याने टिपले आणि आपल्या चाहत्यांशी शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये शाहरुख खानसोबत मॉडेल दिसत आहे, ज्यामध्ये दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. मॉडेलने अबरामसोबत केलेली मजा आणि शाहरुखने स्वतः बनवलेला पिझ्झाचा फोटोही शेअर केला आहे.

ही छायाचित्रे शेअर करताना मॉडेलने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी स्वतःला वचन दिले होते की मी हे कधीही पोस्ट करणार नाही, परंतु या आठवणी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत, त्यामुळे मी त्या फक्त माझ्याकडे ठेवू शकत नाही. मन्नतमध्ये माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस घालवल्याने मी स्वत:ला नशीबवान समजत आहे. किंग खानने स्वतः पिझ्झा बनवला आणि तोही व्हेज, कारण काही पंजाबी शाकाहारीही आहेत. जोपर्यंत मी त्याच्या घरी होते. तोपर्यंत मला असे वाटले की मी स्वप्न पाहत आहे आणि कोणीतरी मला लवकरच उठवणार आहे. मी स्वतःला शांत ठेवले, कारण मला आनंदाने ओरडायचे नव्हते.

हेही वाचा-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मॉडेलने खुलासा केला की शाहरुख खानशी संवाद साधताना तिला खूप आनंद झाला. तिला तिचा आनंद आवरता आला नाही. ती जेवायला बसली तेव्हा पहिल्याच घासात तिचे पोट भरले होते. कारण ती आनंद पचवू शकली नाही. मॉडेलने लिहिले की गौरी खान डार्लिंग आहे. तर अबराम तिचा नवीन चांगला मित्र बनला आहे. आर्यनही खूप प्रेमळ आहे. सुहाना खान खूप सुंदर असल्याचे नवप्रीतने म्हणले आहे.