दिग्दर्शक हंसल मेहता यांचा मुलगा जय मेहता ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये असिस्टंट डायरेक्टर होता. या चित्रपटाच्या सेटवर एका असिस्टंट डायरेक्टरचं निधन झालं होतं. या प्रसंगाबद्दल हंसल मेहतांनी जयशी बोलताना सांगितलं. त्यावेळी जयची परिस्थिती काय होती आणि तरी आपण त्याला घरी का परत बोलावं नाही, याबद्दल हंसल मेहतांनी सांगितलं.

हंसल म्हणाले, “माझं त्यावेळी अनुरागशी काय बोलणं झालं होतं ते तुला आठवतं की नाही, कल्पना नाही. त्यांचा पहिला असिस्टंट डायरेक्टर तरुण मुलगा होता, तो एका अपघातात मरण पावला. तो तुझा रूममेट होता. तो मुलगा खाली पडल्यावर तू मला फोन केला होता आणि तू त्याच्याबरोबर हॉस्पिटलला जात होतास. मग अनुरागने मला फोन केला आणि म्हणाला, ‘जयला खूप धक्का बसला आहे, तो रडत आहे आणि खूप वाईट स्थितीत आहे.'”

सासरी गुजराती पद्धतीने पार पडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं डोहाळे जेवण, पाच महिन्यांपूर्वी केलंय दुसरं लग्न

खरं तर जयला परत बोलवावं, असं आपल्याला वाटलं, याबद्दल अनुरागशी चर्चा केली, पण मग त्याने काहितरी सुचवलं आणि आपलं मत बदललं, असं हंसल मेहता यांनी सांगितलं. “अनुराग म्हणाला, ‘तुम्ही त्याला परत बोलावलं तर तो मुलगाच राहील, पण जर तुम्ही त्याला इथं राहू दिलं तर तो परिपक्व माणूस होईल.’ मी त्याला म्हटलं की तो तुझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. कारण तो माझा मुलगा आहे, त्यामुळे तो माझी जबाबदारी आहे. अनुराग म्हणाला, ‘आम्ही सांभाळून घेऊ. आम्ही सगळे आहोत इथे.’ एक वडील म्हणून माझ्यासाठी हा कठीण क्षण होता कारण तू मला सतत फोन करत होतास आणि मला सांगत होतास की तुला परत यायचं आहे आणि मी तुला टाळत होतो,” असं हंसल मेहता म्हणाले.

विनयभंगाच्या सीनआधी खूप रडली होती माधुरी दीक्षित, काम करण्यास दिलेला नकार; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आठवण

जयला घरी परत यायचं होतं, कारण त्याने जे पाहिलं त्याचा त्रास होत होता. मात्र अनुरागने आग्रह केला की जयने जाऊ नये. “तो म्हणाला की मी तुला रडू द्यावं आणि त्या परिस्थितीतून जाऊ द्यावं. त्यावरूनच तू लूटेरे चित्रपट कसा तयार केलास हे दिसून येतं. गँग्स ऑफ वासेपूरचे दोन्ही भाग असे चित्रपट होते जो १०० दिवसांत कठीण परिस्थितीत बनले होते. तू नाराज होता की मी तुला परत येऊ का देत नाहीये. पण अनुराग व वसंत बाला यांचं म्हणणं होतं की तू तिथेच राहावं. अनुराग हा माझा सर्वात जुना मित्र आहे, तो कधीकधी खूप चिडचिड करतो, परंतु आपल्या आयुष्यातील या एका क्षणामुळे मी त्याला नेहमीच माफ करतो. त्याने तुला टीनेजर ते परिपक्व माणूस होताना पाहिलंय आणि त्यामुळेच आज तू दिग्दर्शक आहेस,” असं हंसल यांनी नमूद केलं.

प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हंसल यांनी खुलासा केला की ‘गँग्स ऑफ वासेपूर’पूर्वी त्यांनी जयला करण जोहरला भेटण्यासाठी तसेच काजोल-करीना कपूर स्टारर ‘वी आर अ फॅमिली’मध्ये काम करण्यासाठी पाठवलं होतं. पण जयने अनुरागबरोबर काम करायचं ठरवलं, कारण त्यावेळी त्याने त्याचा ‘देव डी’ पाहिला होता. नंतर जयने अनुराग कश्यपचा असिस्ंटट डायरेक्टर म्हणून ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मध्ये काम केलं.