Haq box office collection Day 2: यामी गौतम व इमरान हाश्मी यांची प्रमुख भूमिका असलेला हक हा सिनेमा ७ नोव्हेंबर २०२५ ला प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाने दोन दिवसांत किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…
इमरान हाश्मीच्या ‘हक’ चित्रपटाने दोन दिवसांत ‘इतक्या’ कोटींची कमाई
हक या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच १. ७५ कोटींची कमाई केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. हक चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईत ९१.४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसर्या दिवशी या चित्रपटाने ३. ३५ कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांचे भारतातील एकूण कलेक्शन ५.१० कोटी इतके झाले आहे.
हक चित्रपटाबाबत बोलायचे तर हा चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरित आहे. १९८५ च्या शाह बानो खटल्यापासून या चित्रपटाची कथा प्रेरित आहे. घटस्फोटानंतर ६२ वर्षीय मुस्लिम महिलेने तिच्या पतीकडून पोटगीची मागणी केली होती.
या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल अभिनेत्री यामी गौतमने एक्स या सोशल मिडिया हँडलवर पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले, “एक चांगला चित्रपट त्याचा प्रेक्षकवर्ग शोधतो आणि चांगले प्रेक्षक चांगला चित्रपट शोधतात. चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी कृतज्ञ आहे.”
‘हक’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुपरन एस वर्मा यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती जंगली पिक्चर्स, इन्सोम्निया फिल्म्स आणि बावेजा स्टुडिओज यांनी केली आहे. इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांच्याबरोबरच या चित्रपटात वर्तिका सिंग, शीबा चड्ढा आणि दानिश हुसेन हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
आता आगामी काळात या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
दरम्यान, यामी गौतमने काही दिवसांपूर्वी दीपिकाने ८ तासांच्या शिफ्टची मागणी केली होती, त्यावर वक्तव्य केले होते. यामी म्हणालेली की गेल्या अनेक दशकांपासून अनेक पुरुष कलाकार हे आठ तासांची शिफ्ट करत आहेत. फक्त जेव्हा महिला याची मागणी करतात, त्यावेळी हा वादाचा विषय बनतो.
आता यामी गौतम आणि इमरान हाश्मी आगामी काळात कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
