पंजाबी म्यूझिक इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत रॅपर म्हणून यशस्वी प्रवास करणाऱ्या हनी सिंगला आता कोणाच्या ओळखीची गरज नाही. आपल्या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावणाऱ्या हनी सिंगने करिअरमध्ये बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. पण मधल्या काही वर्षांमध्ये तो संपूर्ण इंडस्ट्रीमधून पूर्णपणे गायब झाला होता. अनेकांना त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि आता सर्वांनाच त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. पण आता हनी सिंगने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने मानसिक आजार आणि वेदनादायी संघर्षावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हनी सिंग म्हणाला, “जेव्हा मी आजारी पडलो त्यावेळी आयुष्यात बरंच काही चालू होतं. मी शाहरुखबरोबर स्लॅम टूर केली होती. स्टार प्लसच्या प्रोजेक्टवर काम केलं होतं. ज्याचं नाव मी निवडलं होतं. हा संपूर्ण शो मी स्वतः एक वर्ष देऊन डिझाइन केला होता. जेव्हा शो सुरू झाला तेव्हा माझ्याकडे खूप काम होतं. मी एक पंजाबी चित्रपटही करत होतो. आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत होत्या. ‘रॉ स्टार’च्या सेटवर जेव्हा मी बायपोलर डिसऑर्डर आणि सायकॉटिक लक्षणांशी लढत होतो आणि मला हे माहीतही नव्हतं. पण मला लक्षात आलं होतं की माझ्या मेंदूमध्ये काहीतरी होतंय, काहीतरी समस्या आहे. मला हे ठीक करावं लागेल.

आणखी वाचा-घटस्फोटानंतर पहिल्यांदाच हनी सिंगने दिली टीनाबरोबरच्या नात्याची कबुली, म्हणाला “माझी गर्लफ्रेंड…”

हनी सिंग पुढे म्हणाला, “माझ्या कुटुंबियांनी मला खूप समजवायचा प्रयत्न केला होता. मात्र मी त्यांना सांगितलं की मला काहीच करायचं नाही मला फक्त यातून बाहेर पडायचंय, ठीक व्हायचंय. या सगळ्यातून बाहेर पडायला मला जवळपास ५ वर्ष लागली. मी ठीक झालो. त्यानंतर मला म्यूझिकवर काम करायचं होतं. पण मी आईला म्हणालो, “मी काहीच करू शकत नाहीये असं मला वाटतंय.” त्यावर तिने मला सांगितलं, “तू म्यूझिक डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली होती. बीट्स लिहायला सुरुवात कर” मी लिहायला सुरुवात केली, गाणी हिट झाली पण मी कमबॅक करत असताना बरंच अपयश आलं. माझं वजन वाढलं होतं. लोकांनी माझा लूक नाकारला होता. गाणी हिट होत होती पण लोक मला स्वीकारायला तयार नव्हते.”

आणखी वाचा- लव्ह, सेक्स और धोखा…! प्रेमविवाह, परस्त्रीयांशी शरीरसंबंध अन् घटस्फोट; अशी होती हनी सिंग आणि शालिनीची लव्हस्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबी गायक आणि रॅपर हनी सिंग म्हणजेच यो यो हनी सिंग ‘ब्राउन रंग’,’अचको मचको’, ‘ब्लू आइज’, ‘देसी कलाकर’ या गाण्यासाठी ओळखला जातो. पंजाबी म्यूझिक इंडस्ट्रीसह हनीने बॉलिवूडमध्येही चांगलंच नाव कमावलं आहे. ‘कॉकटेल’, ‘सन ऑफ सरदार’, ‘रेस २’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘की अँड का’, ‘पागलपंती’ आणि ‘भूल भुलैया २’ यांसारख्या चित्रपटांसाठी हीट गाणी दिली आहेत.