बॉलीवूडचा सुपस्टार हृतिक रोशन आज (१० जानेवारीला) आपला ५० वा वाढदिवस साजरा करीत आहे. अभिनयाच्या जोरावर हृतिकने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. हृतिक रोशनला ‘ग्रीक गॉड’ म्हणूनही संबोधले जाते. आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. जगातील सगळ्यात हॅण्डसम पुरुषांमध्ये हृतिक रोशनचे नाव घेतले जाते.

सोशल मीडियावर हृतिक मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तो निरनिराळे व्हिडीओ व फोटो पोस्ट करीत चाहत्यांना अपडेट देत असतो. चित्रपटांव्यतरिक्त हृतिक आपल्या फिटनेसमुळेही नेहमी चर्चेत असतो. अनेकदा तो आपले वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, करोडो लोकांच्या हदयावर राज्य करणाऱ्या हृतिक रोशनला लहापणी एक गंभीर आजार झाला होता. एका कार्यक्रमात हृतिकने या आजाराबाबतचा खुलासा केला होता.

लहानपणापासूनच हृतिकला अभिनेता बनायचे होते; पण एका गंभीर आजारामुळे त्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. २००९ लाली फराह खानच्या ‘तेरे मेरे बीच में’ कार्यक्रमात हृतिकने या आजाराबाबत खुलासा केला होता. हृतिकला त्याला लहानपणी अडखळत बोलण्याचा आजार झाला होता. तो कधीच सरळ व स्पष्ट बोलू शकत नव्हता. त्यामुळे त्याला अनेकदा वडिलांचा ओरडाही खावा लागला होता. हृतिक म्हणालेला “या आजारामुळे मला शाळेत जाण्यासही भीती वाटत होती. कारण- शाळेत माझे मित्र माझ्या या आजाराची त्याची चेष्टा करायचे.”

जवळपास वयाच्या पस्तिशीपर्यंत हृतिकला या आजाराने ग्रासले होते आणि त्याचा त्याच्या करिअरवरही मोठा परिणाम झाला. कारण- अडखळत बोलल्यामुळे तो चित्रपटाची स्क्रिप्टही नीट वाचूही शकत नव्हता. काही दिवसांनी हृतिकने स्पीच थेरपी घ्यायला सुरुवात केली. या उपचाराचा त्याच्यावर चांगला परिणाम झाला आणि अडखळत बोलण्याची त्याची सवय सुटली.

हेही वाचा- पोलिसांचा मार खाल्ला आणि राजकारणाचा विचार सोडला, पंकज त्रिपाठींचा खुलासा; म्हणाले, “असं वाटत होतं की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हृतिकच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले, तर २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाच्या माध्यमातून हृतिकने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. आता लवकरच त्याचा ‘फायटर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पादुकोण, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.