हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२४ च्या पहिल्याच महिन्यात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘फाइटर’ आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या, या हवाई-ॲक्शन चित्रपटाने देशात २१२.६२ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते, तर जगभरात या चित्रपटाने एकूण ६५८.७४ कोटी रुपये कमावले होते. आता निर्माते हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत.

‘फायटर’मध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोणसह अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय आणि संजीदा शेख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २०१९ मध्ये भारतीय हवाई दलाच्या बालाकोट हवाई हल्ल्यावर बेतलेला आहे. ‘फायटर’ वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २५ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसांत प्रचंड नफा कमावला, पण नंतर त्याचा वेग मंदावला. परंतु चित्रपटाच्या कथेचे अन् त्यातील एरियल अॅक्शनचे प्रचंड कौतुक झाले.

Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
video does not show female actress kangana ranauts bjp worker being groped by party members
भाजपाच्या रॅलीत अभिनेत्री कंगना रनौतशी असभ्य वर्तन? व्हायरल होणारा Video नेमका कुठला? वाचा सत्य
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

आणखी वाचा : ‘त्या’ टॉपलेस सीनदरम्यान सिमी गरेवाल होत्या प्रचंड अस्वस्थ; शशी कपूर यांनी ‘अशी’ काढलेली अभिनेत्रीची समजूत

गेल्या महिन्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच ‘फायटर’च्या ओटीटी प्रदर्शनाची चर्चा सुरू होती. निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी सर्व तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षी, होळीचा सण देशभरात २५ – २६ मार्च रोजी साजरा होणार आहे, त्यामुळे होळीच्या आगोदर हा चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून लोकांना सणादरम्यान आपल्या प्रियजनांसोबत घरी बसून चित्रपटाचा आनंद घेता येईल.

‘फायटर’ हा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट होळीच्या चार दिवस आधी २१ मार्चच्या मध्यरात्री ओटीटीवर प्रसारित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व घेणे अनिवार्य आहे. अद्याप याविषयी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी मीडिया रीपोर्टनुसार हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार याची शक्यता वर्तवली जात आहे.