बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. हृतिकचे जगभरात असंख्य चाहते आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याचे फोटो व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच हृतिकने वर्कआउट करतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

“लिव्ह-इन पार्टनरबरोबर…”, कपिल शर्मा शोमधील अभिनेत्याने सांगितलं आत्महत्येचा प्रयत्न करण्याचं कारण

“जर लवकर फॅट लॉस करायचा असेल, बारीक व्हायचं असेल तर व्हिटॅमिन डी (सूर्यप्रकाश) पेक्षा काहीही चांगले नाही,” असं कॅप्शन हृतिकने या पोस्टला दिलंय. KeepGoing असा हॅशटॅग त्याने या कॅप्शनसोबत दिला आहे. पण, त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत काही युजर्स त्याला ट्रोल करत आहेत.

हृतिकने वर्कआऊट करताना जीन्स घातली आहे, तसेच जीन्सचे बटण उघडे आहे आणि त्यातून त्याच्या इनरवेअरचा ब्रँड दिसतोय. यावरून काही जण त्याला ट्रोल करत आहेत. ‘वर्कआऊट करताना जीन्स कोण घालतं’, ‘काहींना कळणार नाही की स्वतःच्या ब्रँडचं प्रमोशन करणारी जाहिरात आहे,’ अशा कमेंट्स काहींनी केल्या आहेत.

hritik roshan
हृतिक रोशनच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

काही जणांनी ‘हृतिक रोशन अंडरवेअरची जाहिरात करतोय’, ‘ब्रँडचे कपडे खपत नसल्याने केलेली जाहिरात’ अशा प्रकारच्या कमेंट्सही त्यावर केल्या आहेत.

hritik roshan
हृतिक रोशनच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, काहींना मात्र हृतिकचा हा फोटो आणि कॅप्शन फार आवडलंय. त्यामुळे ते त्यावर ‘कोई मिल गया’मधील जादूचे फोटो कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करत आहेत.