बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची जोरदार चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम रचत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्याने १२० कोटींची कमाई केली आहे. सध्या संपूर्ण भारतात ‘पठाण’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच अभिनेता हृतिक रोशनने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

“अभिनेता हृतिक रोशन हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. हृतिक रोशनने नुकतंच ‘पठाण’ चित्रपट पाहिला. तो पाहिल्यानंतर त्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. त्याने याबद्दल एक ट्वीट केले आहे.
आणखी वाचा : “अनेक समज” ‘पठाण’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून राम गोपाल वर्मांचे ट्वीट

“फारच उत्तम प्रवास, दृश्य, पटकथा, संगीत, सरप्राईज आणि येणारे ट्वीस्ट या सर्वांनी परिपूर्ण असलेला ‘पठाण’. SID तू पुन्हा करुन दाखवलंस. शाहरुख, दीपिका, जॉन आणि संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन. #Pathan” असे ट्वीट हृतिक रोशनने केले आहे. हृतिक रोशनच्या या ट्वीटवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा : “भारतीय मुस्लीम देशभक्त आहेत” कंगना राणौतचं वक्तव्य; म्हणाली, “पठाण’ चित्रपटाचं नाव बदलून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान चार वर्षांनी मुख्य भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतला. पठाण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग करणारा ठरला आहे. या चित्रपटाने ‘केजीएफ’ आणि ‘बाहुबली’, ‘वॉर’सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाने १०० कोटींचा आकडा ओलांडला आहे.