गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये बायोपिक्सचा बोलबाला आहे. अनेक दिग्गज कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेवक यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आतापर्यंत तयार झाले आहेत. यातील बहुतांश चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तर आगामी काळातही काही बायोपिक्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातील एक म्हणजे गणितज्ञ डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांचा बायोपिक. दोन-तीन वर्षांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून त्यात अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिका साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता हृतिक रोशनच्या जागी दुसरा अभिनेता प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा : मालती मेरीला भेटण्यासाठी परिणीती चोप्रा उत्सुक, लाडक्या भाचीला दाखवणार ‘हा’ चित्रपट

गेली अनेक महिने गणितज्ञ डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांच्या बायोपिकवर या चित्रपटाची टीम काम करत आहे. अख्तर अख्तर आणि रितेश सिधवानी यांचे एक्सेल एंटरटेन्मेंट या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाची कथा ऐकून फरहान अख्तरने तीन मिनिटात हा चित्रपट करण्याला होकार दिला होता. तसेच अभिनेता हृतिक रोशनने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याला होकार दिला होता. मात्र नंतर या प्रोजेक्टचे गणित चुकले.

हेही वाचा : दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन यांच्या ‘फायटर’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्दर्शक नीरज पाठक यांनी ‘बॉलिवूड हंगामा’शी साधलेल्या संवादात या बायोपिकबद्दल अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले, “अभिनेता हृतिक रोशन या चित्रपटात प्रमुख भूमिका सकारायला तयार झाला होता. पण या चित्रपटावरून कोर्टात एक केस सुरु झाली. त्यात आमची दोन वर्ष गेली. अखेर आम्ही ती केस जिंकलो आणि हा चित्रपट बनवण्याचे अधिकार आम्हाला मिळाले. परंतु हृतिक रोशनने ‘सुपर ३०’ या चित्रपटात अशीच भूमिका केल्याने आता आम्ही त्याला या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी कास्ट करू शकत नाही. हृतिकच्या जागी आम्ही दुसऱ्या अभिनेत्याच्या शोधात आहोत.” त्यामुळे आता या चित्रपटात हृतिक रोशनच्या जागी कोणता अभिनेता दिसतोय आणि हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.