सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय स्टारकिड आहे. तो नेहमी चर्चेचा विषय ठरतो. इब्राहिम अजून मनोरंजन सृष्टीत आला नसला तरीही त्याचे वडील सैफ अली खान आणि त्याची बहिण सारा अली खान यांच्या प्रमाणेच त्याच्याबद्दलही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता त्याचा लूक आणि त्याने परिधान केलेल्या कपड्यांच्या किंमतीमुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आहे.

इब्राहिमचा एक व्हिडीओ सध्या खूप वायरल होत आहे. नुकताच ‘आदिपुरुष’चं एक स्पेशल स्क्रीनिंग मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं, त्या वेळेचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये इब्राहिम अली खान गाडीतून उतरून चित्रपटगृहात जाताना दिसत आहे. परंतु या स्क्रीनिंग दरम्यान त्याने घातलेली हूडी सर्वांसाठी चर्चेचा विषय बनली आहे.

आणखी वाचा : असाच नवरा हवा! सारा अली खानने सांगितल्या मनातल्या अपेक्षा; लग्न कधी करणार याचा खुलासा करत म्हणाली…

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने काही महिन्यांपूर्वीच त्याचा D’YAVOL X हा स्वतःचा कपड्याचा ब्रँड लॉन्च केला. याच ब्रँडची हूडी परिधान करून इब्राहिम ‘आदिपुरुष’च्या स्क्रीनिंगला पोहोचला होता. काळ्या रंगाच्या या हूडीवर उजव्या बाजूला एक लाल रंगाचा क्रॉस आहे. या हूडीची किंमत थोडी थोडकी नाही तर तब्बल दोन लाख आहे.

हेही वाचा : “किडनी विकून…,” आर्यन खानने सुरू केला कपड्यांचा ब्रँड, कपड्यांची किंमत पाहून नेटकऱ्यांनी शाहरुखच्या लेकाला केलं ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इब्राहिमने जी हूडी परिधान केली आहे तशाच होळीमध्ये आर्यन आणि शाहरुखचेही फोटो आहेत. तर आता इब्राहिमच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.