बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री इलियाना डिक्रुझ लग्न न करताच आई झाली आहे. इलियानाने मंगळवारी १ ऑगस्टला बाळाला जन्म दिला. तिने सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली. यानंतर आता इलियानाचा पती कोण, त्यांचे लग्न कधी झाले, यांसह सर्व माहिती समोर आली आहे.

इलियानाने १८ एप्रिल रोजी तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. तिने बेबी बंप दाखवत एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता शनिवारी ५ ऑगस्टला तिने एक पोस्ट शेअर करत बाळाला जन्म दिल्याचे सांगितले.
आणखी वाचा : लग्न न करताच इलियाना डिक्रुझ झाली आई, गोंडस बाळाचा पहिला फोटो आला समोर, नावही आहे खास

इलियानाने १ ऑगस्ट २०२३ रोजी बाळाला जन्म दिला. त्याने त्याचे नाव ‘कोआ फिनिक्स डोलन’ असे ठेवले आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने “आमच्या लाडक्या मुलाचे या जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होतोय, हे आम्ही शब्दात मांडू शकत नाही. मन आनंदाने भरून आलंय”, असे म्हटले आहे.

इलियानाच्या बाळाच्या जन्मानंतर आता त्या बाळाचा बाबा कोण? याबद्दलची माहिती समोर आली आहे. ‘डीएनए’ या वेबसाईटने लग्न नोंदणी तपशीलाच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर चार आठवड्यांनी इलियानाने लग्न केलं. इलियानाच्या पतीचे नाव मायकल डोलन असे आहे. ते दोघेही १३ मे रोजी विवाहबंधनात अडकले.

आणखी वाचा : इलियाना डिक्रुझने पहिल्यांदाच दाखवला होणाऱ्या बाळाच्या बाबांचा चेहरा, फोटो शेअर करत म्हणाली…

इलियाना आणि मायकल या दोघांचे लग्न कुठे झाले? किती वाजता झाले? याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी इलियानाने वधूच्या पोशाखात एक फोटो शेअर केला होता. त्यावेळी तिच्या आजूबाजूला सजावट पाहायला मिळत होती. पण हा तिच्या लग्नाचा फोटो आहे की एखाद्या फोटोशूटचा याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मायकल डोलन हा नक्की कोण आहे, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र इलियाना आणि तो गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखत असल्याचे बोललं जात आहे.