आज अनेक भारतीय गायिकांनी आपल्या आवाजाने लाखो लोकांना वेड लावलं आहे. अरिजित सिंग, सोनू निगम, श्रेया घोषाल सारख्या अनेक गायक एक गाणं गाण्यासाठी लाखो रुपये घेतात. अभिनेतेच नाही तर गायकांच्या संपत्तीचे आकडे वाचून सर्वसामान्यांना धक्का बसतो. मात्र, १८७३ भारतात अशी एक गायिका होऊन गेली आहे. जिने त्या काळात एक गाणे गाण्यासाठी आजच्या काळातील १कोटी रुपये मानधन घेतले होते. या गायिकेला भारतातील पहिली करोडपती असणारी गायिका म्हणले जायचे. कोण होती ती गायिकाघ्या जाणून

हेही वाचा- “मी तुमच्यावर…”; धर्मेंद्र यांच्या भावनिक पोस्टला ईशा देओलचे उत्तर, म्हणाली…

२६ जून १८७३ रोजी जन्मलेल्या गौहर जान या भारतातील पहिले गाणे रेकॉर्ड करणाऱ्या पहिली गायिका होत्या. त्यांची फी इतकी जास्त होती की त्यांना गाणं गायला सांगण्यापूर्वी प्रत्येक जण दोनदा विचार करायचे. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा १० ग्रॅम सोन्याची किंमत २० रुपये होती. त्या काळात गौहर जान गाणे रेकॉर्ड करण्यासाठी ३ हजार रुपये आकारत होत्या. आजच्या महागाईशी जुळवून घेतल्यास ही रक्कम प्रति गाणे सुमारे एक कोटी रुपये होईल.

हेही वाचा- Video: अभिनेत्री अदा शर्मानं आषाढी एकादशीनिमित्तानं दिल्या खास शुभेच्छा; गायलं ‘रखुमाई रखुमाई’ गाणं

गौहर जान यांची गाणी ऐकणे हे सर्वसामान्यांचे स्वप्न होते. त्यामुळे ग्रामोफोन कंपनीने त्यांची गाणी रेकॉर्ड करून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली. जेव्हा जेव्हा त्यांना गाण्यासाठी आमंत्रित केले जायचे तेव्हा तेव्हा त्या खासगी रेल्वेही तिथं यायच्या. गौहर जान यांच्याकडे सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने होते. असं म्हणतात एकदा घातलेला दागिना त्या परत कधीच घातल नसायच्या. गौहर जान या भारतातील पहिल्या करोडपती असणाऱ्या गायिका होत्या. १९०२ ते १९२० दरम्यान, गौहर जान यांनी दहा भाषांमध्ये जवळपास ६०० गाणी गायली आहेत.

हेही वाचा- “आपले देव Cool आहेत हे दाखवायला हवं”, आदिपुरुषमधील अभिनेत्याने केलं चित्रपटाचं समर्थन; म्हणाला, “पॉप कल्चर…”

गौहर जान यांनी गायनात इतिहास रचला. मात्र, त्यांचे बालपण संघर्षमय होते. त्यांनी आपले बालपण वेश्यालयात घालवले. गौहर जान यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. गौहर जान यांचा जन्म गौहर जानचा जन्म उत्तर प्रदेशमधील आझमगडमध्ये झाला. त्यांचे वडील इंग्रज वडील आणि आई आर्मेनियन होती. गौहर जान अवघ्या ६ वर्षांच्या असताना त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यानंतर गौहर जान आईबरोबर बनारसला गेल्या. जिथे त्यांनी त्या काळातील काही महान संगीत आणि नृत्य उस्तादांकडून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर १८८३ मध्ये त्या कोलकाता येथे आल्या आणि त्यांनी आपलं नाव बदलून मलका जान ठेवले.

हेही वाचा- “४०० लोकांसाठी एक टॉयलेट अन्…” ; ड्रग्ज प्रकरणी तुरुंगात राहिलेल्या अभिनेत्याने सांगितला धक्कादायक अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे पैसा, संपत्तीत नशिबवान ठरलेल्या गौरह जान खऱ्या प्रेमाच्या बाबतीत मात्र कमनशिबी ठरल्या होत्या. गौहर जान यांनी त्यांच्याहून निम्म्या वयाच्या पठाणशी लग्न केले. पण हे नातेही फार काळ टिकले नाही. वाढत्या वयाबरोबर गौहर खान यांचा इंडस्ट्रीतील दबदबा कमी होऊ लागला. गौहर यांनी आयुष्यातील शेवटचे दिवस एकाकीपणात घालवले होते. विस्मृतीच्या अवस्थेत गौहर जान यांनी १७ जानेवारी १९३० रोजी वयाच्या ५६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.