‘इंडियन पोलीस फोर्स’ या अमेझॉन प्राइमवरील वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी, मृणाल कुलकर्णी, श्वेता तिवारी अशा तगड्या कलाकारांची फौज होती. या सीरिजमध्ये झरार उर्फ हैदर नावाचं दहशतवाद्याचं महत्त्वाचं पात्र अभिनेता मयंक टंडनने साकारलं होतं. या भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक झालं. पण सध्या मयंक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

मयंक टंडनने लग्न केलं आहे. मयंकने त्याची गर्लफ्रेंड मयुरी सोनीशी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या रिसेप्शनला रोहित शेट्टी, शिल्पा शेट्टी, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, पूजा हेगडेसह अनेक बॉलीवूडकरांनी हजेरी लावली होती. मयंकने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लग्नाची बातमी चाहत्यांना दिली. ‘And they lived happily ever after…’ असं कॅप्शन देत मयंकने मयुरीला मिठी मारल्याचा एक फोटो शेअर केला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुजराती बिझनेसमनशी गोव्यात बांधली लग्नगाठ, भर मंडपात केलं लिपलॉक, Photos चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मयंकने शेअर केलेल्या फोटोवर चाहते व त्यांचे मित्र-मैत्रिणी कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, मयंक टंडनबद्दल बोलायचं झाल्यास त्याने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्याने ‘एहसास’ व ‘टशन’ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. याशिवाय त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.