scorecardresearch

Video : रेड कार्पेटवर चालताना अनुष्काचा ड्रेस हिल्समध्ये अडकला, विराट कोहलीने केलं असं काही…

विराटच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

virat kohli anushka sharma
विराट-अनुष्काचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांच्या यादीत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे नाव कायमच चर्चेत असते. ते दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या जोडीचे जगभरात चाहते आहेत. नुकतंच विराट-अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विराटच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

मुंबईत नुकताच इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स २०२३ हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लालवी होती. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. नुकतंच या कार्यक्रमातील विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
आणखी वाचा : “आमच्या मुलीचे फोटो…” आलिया भट्टच्या ‘त्या’ पोस्टनंतर अनुष्का शर्माने सांगितला अनुभव

या व्हिडीओत विराट आणि अनुष्का हे त्या कार्यक्रमासाठी दाखल झाल्याचे दिसत आहेत. तसेच ते फोटोग्राफर्सला पोज देताना दिसत आहेत. यावेळी रेड कार्पेटवर चालत असताना अनुष्काचा ड्रेस हा तिच्या हिल्समध्ये अडकत असल्याचे विराटच्या लक्षात आले. ते पाहून त्याने अनुष्काला थांबवले आणि तिचा ड्रेस नीट केला. विराटची ही कृती पाहून अनुष्काने त्याला थँक्यू असे म्हटले.

या कार्यक्रमावेळी विराट-अनुष्का फारच आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहेत. विराटने या कार्यक्रमासाठी छान सूट परिधान केला आहे. तर अनुष्काने जांभळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. त्या दोघांनीही सोशल मीडियावर याचे फोटोदेखील शेअर केले आहेत. या दरम्यानचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “विवाहित असाल…” अनुष्काने सांगितले लवकर लग्न करण्यामागचे खरं कारण

अनुष्का शर्मा लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात ती क्रिकेटपटू झुलन गोस्वामीची भूमिका साकारत आहे. तर विराट कोहली हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका संपल्यानंतर विश्रांती घेत आहे. येत्या ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२३ मध्ये खेळताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 10:29 IST

संबंधित बातम्या