‘वेलकम ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने काही दिवसांपूर्वी याबद्दल माहिती दिली होती. त्याने ‘हिंदुस्तान टाईम्स सिटी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, या चित्रपटाच्या तिसऱ्या भागावर लवकरच काम सुरू होणार आहे. ‘वेलकम ३’ मध्ये अर्शद वारसीबरोबरच अक्षय कुमार, परेश रावल आणि संजय दत्त देखील दिसणार आहेत.

‘वेलकम’च्या आधीच्या दोन भागांमध्ये नाना पाटेकर आणि अनिल कपूर होते. उदय शेट्टी आणि मजनू भाई या दोन भूमिका या दोन अभिनेत्यांनी अजरामर केल्या होत्या. मात्र हे दोघेही नव्या चित्रपटात दिसणार नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. उदय आणि मजनू ही दोन्ही पात्रं यात असणार आहे पण त्या भूमिकांसाठी संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची निवड झाली आहे.

आणखी वाचा : पत्नी रुग्णालयात असताना चाहत्याच्या ‘या’ वाक्यामुळे संतापलेले सतीश शाह; अभिनेत्यानेच केला खुलासा

‘पिंकव्हीला’ला मिळालेल्या रिपोर्टनुसार, “वेलकम ३ या चित्रपटावर काम सुरू झालं आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे. निर्माते यात काही बदल करणार आहेत. अर्शद वारसी मजनूची भूमिका तर संजय दत्त उदय शेट्टीची भूमिका निभावणार आहे. ‘मुन्नाभाई’ आणि ‘सर्किट’ याप्रमाणे या दोन्ही पात्रातही तीच केमिस्ट्री आपल्याला बघायला मिळेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या निर्माते फिरोज नाडियाडवाला हे ‘हेरा फेरी ३’, ‘आवारा पागल दिवाना २’ आणि ‘वेलकम ३’ या तीन मोठ्या चित्रपटावर काम करत आहेत. नाना पाटेकर, अनिल कपूर, अक्षय कुमार, परेश रावलचा ‘वेलकम’ हा रुपेरी पडद्यावरचा सुपरहिट चित्रपट ठरला होता. दुसऱ्या भागाला फारसं यश मिळालं नव्हतं पण आता या तिसऱ्या भागासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.