बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या रॅम्प वॉकची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दोघांनीही डिझाईनर शांतनू आणि निखिलसाठी ‘इंडिया कॉउचर वीक २०२३’ मध्ये शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला. या दोघांच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : “लोक काय म्हणतील याची पर्वा…”, ईशा केसकरने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “लग्न केले तर…”

साराने ‘इंडिया कॉउचर वीक २०२३’मध्ये ऑफ व्हाईट क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर, दुसरीकडे पांढऱ्या सलवारसह क्रीम कलरची शेरवानी परिधान केली होती. दोघांनीही शो स्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला. सारा-आदित्यचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी आदित्यचे भरभरून कौतुक केले मात्र, सारा अली खानच्या चेहऱ्यावरील हावभावांमुळे तिला ट्रोल करण्यात आले.

हेही वाचा : “दोघांनीही त्या सीनसाठी…”, धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या लिपलॉक सीनवर करण जोहरने मांडले मत, म्हणाला…

सारा अली खानचे रॅम्प वॉक करतानाचे हावभाव पाहून तिला ट्रोल करण्यात येत आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत “सारा इथेही खूप जास्त ओव्हरॲक्टिंग करते आहे” असे म्हटले आहे. आणखी काही युजर्सनी, “हिला रॅम्पवर चालताही येत नाही, भयानक चालतेय…”, “ना अभिनय, ना रॅम्प वॉक…मला हिचे काहीच आवडत नाही.” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहे.

हेही वाचा : पाकिस्तानी सीमा हैदर हिंदी चित्रपटांमध्ये झळकणार? निर्मात्याने ऑफर दिल्यावर म्हणाली, “मी विचार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एकत्र रॅम्प वॉक केल्यानंतर लवकरच सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर ‘मेट्रो इन दिनो’ या अनुराग बासूच्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यामध्ये सारा आणि आदित्यसह कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अनुपम खेर, अली फजल आणि नीना गुप्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.